Sangli loksabha vishal patil : सांगली लोकसभेच्या (Sangli loksabha) जागांवरुन काँग्रेसमध्ये (Congress) मतभेदाचे वातावरण तयार झालं आहे. या जागेवर काँग्रसचे युवा नेते विशाल पाटील (vishal patil) यांना बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी तिकीट मिळाले आहे. यानंतर सांगली काँग्रेसच्या (Sangli Congress) नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस हायकमांड कारवाई करण्याची शक्यता आहे. 


विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता


सांगली लोकसभेत बंडखोरी केल्यामुळं उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस आज कारवाई करण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांड आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याची सूचना करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना दिलेला अल्टीमेटम आज संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा द्यावा, अशी सूचना हायकमांडनं केली होती. मात्र, विशाल पाटलांनी ही सूचना मान्य केली नाही. अखेर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. 


तिसरा मतदानाचा टप्पा हा 7 मे रोजी


सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशात एकूण सात टप्प्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. यातील दोन टप्पे पार पडले आहेत. यामध्ये राज्यातील काही भागात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता यामधील पुढचा म्हणजे तिसरा मतदानाचा टप्पा हा 7 मे रोजी होणार आहे. या टप्प्यात देशातील महत्वाच्या लढती होणार आहेत. विशेष पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या लढती 7 मे रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग आलाय. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामध्ये महत्वाची लढत म्हणजे सांगली लोकसभेची. या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंड केलं आहे. विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्य़ास इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यांच्याऐवजी चंद्रहार पाटील यांना लोकसभेचं तिकीट मिळालं. त्यामुळं नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


 


महत्वाच्या बातम्या:


अकोल्यातील मतदान झाल्यानंतर वंचितने प्रकाश शेंडगेंचा पाठिंबा काढला, आता सांगलीत विशाल पाटलांना साथ