मुंबई : अभिनय, क्रिकेट जगतातील लोक कसे जगत असतील, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या क्षेत्रात काम करणाऱ्या बहुसंख्य व्यक्ती या कोट्यधीश असतात. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचे (Net Worth Of Anushka Sharma) नाव प्राधान्यक्रमाने घ्यावे लागेल. अनुष्का शर्मा ही क्रिकेटर विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी आहे. सोशल मीडिया, चित्रपट दुनियेत तिचे लाखो चाहते आहेत. विशेष म्हणजे कमाईच्या बाबतीतही ही अभिनेत्री फार पुढे आहे. अनेक ब्रँड्सच्या जाहिराती, अभिनय यातून ती दरवर्षी कोट्यवधी रुपये कमवते. तिच्याकडे असलेली संपत्ती पाहून सामान्य माणसाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. 


अनुष्का शर्माची एकूण संपत्ती किती? 


अनुष्का शर्माने अभिनय क्षेत्रात मोठं नाव कमवलेलं आहे. अभिनयाच्या जोरावरच जगातील सर्व सुख तिच्या पायाशी लोळण घेतंय. ती एकूण 350 कोटी रुपयांची मालकीण असल्याचं म्हटलं जातं. ती एका वर्षात साधारण 45 कोटी रुपये कमवते, असं म्हटलं जातं. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांची एकूण संपत्ती 1200 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. या जोडीने लग्न केल्यानंतर मुंबईत 34 कोटी रुपयांचे एक आलिशान घर घेतले होते. गुरुग्राममध्ये त्यांची 80 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.


फोर्ब्स इंडिया 2019 च्या कॅलेंडर लिस्टनुसार विराट-अनुष्काची जोडी भारतातील सर्वांत श्रीमंत जोडींपैकी एक होती. विराट कोहलीचे दिल्लीमध्येही एक आलिशान घर आहे. विराट-अनुष्का यांच्याकडे अनेक आलिशान कार आहेत.  


या मार्गानेही अनुष्का कोट्यवधी रुपये कमवते


मीडिया रिपोर्टनुसार अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपयांची फी घेते. एखादी जाहिरात करायची असेल तर ती 4-5 कोटी रुपयांची फी घेते. यासह ब्रँड्स एंडोर्समेंट, जाहिराती, खासगी गुंतवणूक, स्वत:चा व्यवसाय अशा वेगवेगळ्या मार्गांनी अनुष्का पैसे कमवते. इन्स्टाग्रावर पोस्ट टाकूनही अनुष्का लाखो रुपये कमवते. अनुष्का शर्माकडे एक किंवा दोन नव्हे तर 17 कंपन्यांच्या ब्रँड एंडोर्समेंटचे काम आहे. यामध्ये रजनीगंधा पर्ल्स, फॅशन ब्रँड Lavie, रूपा अँड कंपनी, केरोवित, Standard Chartered Bank, Pure Derm, Ell 18, Centrum India, गीतांजली, प्रेगा न्यूज, गोदरेज एक्सपर्ट, Pantene, ब्रू कॉफी, लिप्टॉन पेप्सी अशा ब्रँड्सचा समावेश आहे. 


(टीप-हा एक माहितीपर लेख आहे. यामध्ये काही सांख्यिक बदल असू शकतो.)


हेही वाचा :


अब्जो रुपये बाजार भांडवल असलेल्या गोदरेज उद्योग समुहाची विभागणी, कोणाला कोणती कंपनी मिळणार?


मोठी बातमी! नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर स्वस्त; बँकेच्या नियमांतही बदल


करप्रणालीत बदल कसा करावा? नव्या वर्षात हे शक्य आहे का? जाणून घ्या सविस्तर