Actress Rupali Ganguly Join BJP :  छोट्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री रुपाली गांगुलीने (Rupali Ganguly) आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नवी दिल्लीत रुपाली गांगुलीने भाजपात प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी रुपाली गांगुलीचे भाजपात स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कामाने मला प्रभावित केले असून मी त्यांची चाहती असल्याचे रुपाली गांगुलीने म्हटले. 


सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून इतर ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. तर, विविध राजकीय पक्षात इनकमिंग-आउटगोईंग सुरू आहे. आज भाजपच्या पक्ष कार्यालयात अभिनेत्री रुपाली गांगुलीने पक्ष प्रवेश केला. 






 






सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेली लोकप्रिय मालिका अनुपमामध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीने आज भाजपात प्रवेश केला.  रुपाली गांगुली ही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कंगना रणौत, अरुण गोविल या कलाकारांच्या यादीत आता रुपाली गांगुलीचा समावेश झाला आहे.  


विकासाच्या महायज्ञात सहभागी होण्याचा निर्णय... 


देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या विकासाचा हा महायज्ञ पाहिल्यानंतर मला देखील यात सहभागी व्हावे वाटले. मला तुमच्या आशीर्वादाची आणि पाठिंब्याची गरज आहे. जेणेकरून मी जे काही काम करेल ते चांगले काम करेल असे रुपालीने माध्यमांशी संवाद साधताना म्हटले. 


'साराभाई व्हर्सेस साराभाई' या कॉमेडी सीरियलमध्ये रुपालीने मोनिषाची व्यक्तीरेखा साकारली होती. तिची व्यक्तीरेखा चांगलीच लोकप्रिय झाली होती. रुपालीने मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. तिने या भेटीची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर दिली होती. 


इतर महत्त्वाची बातमी :