NPS योजना आहे तरी काय? या योजनेचे 'हे' खास फायदे माहिती आहेत का?
एनपीएस ही योजना चांगली असून तिचे काही खास फायदे आहेत. या योजनेतून येणाऱ्या पैशांवर कोणताही कर आकारला जात नाही. तसेच आपत्कालीन स्थितीत पैसे काढण्याची सोयदखील या योजनेत आहे.
मुंबई : नोकरीवर असताना आपण वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवणूक करतो. कोणी शेअर बाजारात पैसे लावतं. तर कोणी म्यूच्यूअल फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र निवृत्तीनंतर येणाऱ्या आर्थिक चणचणीविषयी अनेकजण तेवढा विचार करत नाहीत. याच आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक चणचण भासू नये म्हणून एनपीएस (NPS) म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम (National Pension System) ही योजना एक चांगला पर्याय आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळते. दरम्यान, या योजनेत पैसे गुंतवण्याचे चार महत्त्वाचे फायदे जाणून घेऊ या..
कमी फी, जास्त रिटर्न्स (Benefits of NPS)
अन्य योजनांच्या तुलनेत या योजनेत पैसे गुंतवताना कमी फी आकारली जाते. म्यूच्यूअल फंडशी तुलना करायची झाल्यास या योजनेत वर्षाला 2 ते 2.5 टक्के फी द्यावी लागते. एनीपएसमध्ये मात्र यापेक्षा कमी फी आकारली जाते.
एनपीएसमुळे कर वाचतो
एनपीएस योजनेत कराचीही बचत होते. एनपीएस योजनेत गुंतवलेल्या पैशांवर मिळणारे व्याज आणि म्याच्यूरिटीनंतर मिळणारी रक्कम यावर कर आकारला जात नाही. NPS योजनेत पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला सेक्शन 80सी अंतर्गत टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो. सेक्शन 80CCD (1B) अंतर्गतही टॅक्स बेनिफीट मिळते. या कलमाअंतर्गत 50 हजा रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कोणताही कर आकारला जात नाही. एनपीएस योजनेमुळे तुम्हाला एकूण 2 लाख रुपयांचा करबचतीचा फायदा होतो.
एनपीएस योजनेत असेट क्लास बदलण्यासाठी किंवा फंड मॅनेजर बदलण्यासाठी कोणताही टॅक्स लगात नाही. तसेच तुम्हाला किती पैशांची गुंतवणूक करायची आहे. तुम्ही गुंतवलेला पैसा नेमका कोठे लावायचा आहे, हे तुम्ही स्वत: ठरवू शकता.
आपत्कालीन स्थितीत पैसे काढता येतात
एनपीएस योजनेत तुम्ही गुंतवलेला पैसा थेट निवृत्तीनंतरच मिळेल, असे नाही. एनपीएस योजना ही लवचिक योजना आहे. गरज पडल्यास आपत्कालीन स्थितीत तुम्ही जमा केलेले पेसै काढू शकता. मात्र त्यासाठी तुम्ही कमीत कमी तीन वर्षांपासून एनपीएस योजनेचे सबस्क्रायबर असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही एनपीएस योजनेत फक्त तीन वेळाच पैसे काढू शकता. त्यातही एकूण जमा रकमेच्या 25 टक्केच रक्कम तुम्हाला मिळू शकते.
हेही वाचा :
सावधान! बँकेच्या 'या' नव्या नियमाकडे करू नका कानाडोळा, अन्यथा तुमचे बँक खाते थेट होईल बंद!
24 कॅरेट की 22 कॅरेट? नेमकं कोणतं सोनं सर्वांत चांगलं? दागिने नेमके कशाचे करावेत?