Risk in Fixed Deposit (FDs) : कोणतीही जोखीम न पत्करता गुंतवलेल्या पैशांतून चांगला परतावा मिळावा, असे प्रत्येकालाच वाटते. अनकजण गुंतवणुकीच्या अशा सुरक्षित पर्यायाचा शोध घेत असतात. दरम्यान, एफडी (FD) हा गुंतवणुकीच्या सर्वाधिक सुरक्षित पर्यायांपैकी एक पर्याय मानला जातो. तुम्ही एफडी केलेल्या पैशांवर निश्चित व्याज मिळते. शेअर बाजार (Share Market) किंवा भांडवली बजारात काहीही घडले तरी तुमच्या एफडीवर परिणाम होत नाही. म्हणूनच एफडीच्या माध्यमातून गुंतवलेले पैसे हे सुरक्षित मानले जातात. पण एफडीत गुंतवलेले तुमचे सर्वच पैसे खरंच सुरक्षित असतात का?  तुमच्या पैशांना खरंच धोका नसतो का? हे जाणून घेऊ या.. 


100 टक्के रक्कम सुरक्षित नसते 


एफडीत गुंतवलेली रक्कम ही इतर गुंतवणुकीच्या तुलनेत सुरक्षित असते. मात्र बँक आर्थिक अडचणीत सापडली. बँक डिफॉल्ट झाली तर एफडीत पैसे गुंतवणाऱ्यांची फक्त 5 लाखांपर्यंतची रक्कमच सुरक्षित असते. फायनान्स कंपन्यानाही हा नियम लागू होतो. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) ही रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अखत्यारितील आस्थापना 5,00,000 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतणुकीवरच विम्याची गॅरन्टी देते. 


महागाईत तुमचा नफा घटतो 


तुम्ही बँकेत एफडीच्या माध्यमातून गुंतवत असलेल्या पैशांवर व्याजदर अगोदरच ठरलेला असतो. मात्र कालांतराने महागाई ही वाढत जाते. त्यामुळे महागाई आणि तुम्हाला एफडीच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याजाची तुलना केली तर तुम्हाला मिळणाऱ्या परताव्याचे  मूल्य कमी होते. उदाहरणासह सांगायचे झाल्यास महागाई दर सहा टक्क्यांवर गेला असे गृहित दरू. तसेच एफडीवर तुम्हाला 5 टक्के व्याज मिळत आहे असे समजू. तुमच्या एफडीची मुदत संपल्यानंतर मिळालेल्या परताव्याचे वाढीव मूल्य महागाई दराच्या तुलनेत फार कमी असेल.  


प्रत्येक बँकेची प्री-मॅच्यूअर पेनॉल्टी वेगळी असते


बँकेत केलेल्या एफडीत लिक्विडिटीची अडचण असते. गरज पडल्यास एफडी तोडता येते. पण त्यासाठी प्री-मॅच्यूअर पेनॉल्टी द्यावी लागते. FD वर वेगवेगळ्या बँका प्री-मॅच्यूअर पेनॉल्टीवर वेगवेगळी फी आकारतात. 


(ही माहिती इंटरनेटवर असलेल्या माहितीवर आधारित आहे. एफडी, एफडीचे नियम आणि अटी याबाबतची अधिक माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून किंवा बँकांकडून घ्या.)


हेही वाचा :


तुमच्या पूर्वजांनी 'ही' एक गोष्ट केली असती तर तुमचं नशीब फळफळलं असतं; एका क्षणात झाले असता लखपती!


राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार मोफत उपचार!


प्रत्येकाकडे 'हा' एक विमा असायलाच हवा, मृत्यूनंतर मुलं, जोडीदाराचा आर्थिक प्रश्न मिटून जाईल!