IIT Bombey : रामायणावर (Ramayana) कथितरित्या आक्षेपार्ह्य नाटकाचं सादरीकरण केल्याप्रकरणी आयआयटी बॉम्बेनं (IIT Bombey News) विद्यार्थ्यांना दंड ठोठावला (Students Were Fined) आहे. हा दंड थोडा थोडका नसून तब्बल 1.2 लाखांचा आहे. 31 मार्च रोजी आयआयटी बॉम्बेचा वार्षिक कला मोहोत्सव (IIT Bombay Annual Art Festival) पार पडला. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाटक सादर करण्यात आलं. पण या नाटकात भगवान सीता-रामाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलेला. याच प्रकरणी आयआयटी बॉम्बेनं कठोर पावलं उचलत एका विद्यार्थ्यांला याप्रकरणी तब्बल 1.2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 


नेमकं काय घडलं? 


परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल किंवा पीएएफ हा आयआयटी-बॉम्बेचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यावर्षी मार्चमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि 31 मार्च रोजी कॅम्पसच्या ओपन-एअर थिएटरमध्ये हे नाटक सादर करण्यात आलं होतं. पुढील काही दिवसांत, एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये रामायणातील तथ्यांसह नाटकातील क्लिपिंग्ज दर्शविल्या गेल्या, कलात्मक स्वातंत्र्यावर वादविवाद झाला आणि या नाटकातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. 


आयआयटी बॉम्बेनं रामायणावर आक्षेपार्ह नाटक केल्याच्या आरोपावरून विद्यार्थ्यांना मोठा दंड ठोठावला आहे. आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी 'राहोवन' या नाटकात सहभागी झाले होते. या नाटकाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या नाटकात विद्यार्थ्यांनी राम आणि सीता यांची पात्रं आक्षेपार्ह पद्धतीनं मांडल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, नाटकाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, हे नाटक प्रगतीशील होतं, त्याचे सर्वांनी कौतुक केलं.


विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांच्या दंडाची वसुली 


या नाटकाबाबत केलेल्या तक्रारींमध्ये या नाटकामुळे आपली संस्कृती आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं आहे. या तक्रारींनंतर शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत, त्यांनाही या बैठकीत बोलावण्यात आलं. या कालावधीत बराच विचारविनिमय केल्यानंतर समितीनं कठोर कारवाईचा निर्णय घेतला. या अंतर्गत वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून 1.2 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ज्युनियर विद्यार्थ्यांना 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शिवाय वसतिगृहाच्या सुविधांपासूनही वंचित होते. याप्रकरणी सात विद्यार्थ्यांना शिक्षा झाल्याचं बोललं जात आहे.


दरम्यान, याप्रकरणी आयआयटी बॉम्बेकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.