Legislative Council Elections : विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) 11 जागांसाठी  लवकरच निवडणूक (Election) होणार आहे. त्या 11 जागेत नांदेडच्या (Nanded) सुद्धा जागेचा समावेश आहे. त्यासाठी भाजपच्या (Bjp) पदाधिकाऱ्याने थेट राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) व माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पत्र लिहले आहे. आता नांदेड मधून निष्ठावंताना उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपचे पदाधिकारी मनोज जाधव (Manoj jadhav) यांनी केली आहे.  


भाजप विधानपरिषदेसाठी पुन्हा राम पाटील रातोळीकरांना उमेदवारी देणार का?


दरम्यान, मनोज जाधव यांनी विधानपरिषदतेत निष्ठावंतांना संधी देण्याच्या मागणीबरोबरच पत्रात काही नावांचा देखील उल्लेख केला आहे. या पत्रात विधापरिषदेसाठी प्रवीण साले, बालाजी बच्चेवार आणि चैतन्य बापू देशमुख यांची नाव सुद्धा पत्रात नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे आता हा 3 नावांची चर्चा सुरु आहे. आता भाजप पुन्हा विधानपरिषदेसाठी राम पाटील रातोळीकर यांना उमेदवारी देईल का? याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. 


12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान


राज्यसभेनंतर विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 


9 जागा निवडूण आणण्याचा महायुतीचा प्रयत्न


आता विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे. भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती ९ जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो.


कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?


25 जून - अधिसूचना जारी


2 जुलै - अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख


3 जुलै - अर्ज छाणणी


5 जुलै - अर्ज मागे घेण्याची तारीख


12 जुलै - मतदान (सकाळी 9 ते दुपारी 4)


12 जुलै - मतमोजणी (संध्याकाळी 5 वाजता)


'या' आमदारांचा कार्यकाल संपला


मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


विधानपरिषद निवडणुकीसाठी बिगुल वाजलं; लोकसभा निकाल लागताच महाराष्ट्रात पुन्हा रणधुमाळी