मुंबई : सोने हा असा धातू आहे, ज्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आलेली आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर सोन्याचा भाव सातत्याने वाढलेला दिसेल. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतोय. एमसीएक्सवर सध्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव 72,000  रुपये झाला आहे. भविष्यातही सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत याआधीच्या काही दशकापूर्वी सोन्याचा दर काय होता, हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या पूर्वजांनी फक्त एक गोष्ट केली असती तर तुम्ही आज लखपती असते. 


आजीने हे एक काम केले असते तर तुम्ही असते लखपती


साधारण 50-55 वर्षांपूर्वी तुमच्या आजी, अजोबा किंवा पूर्वजांनी सोन्यात गुंतवणूक केली असती आणि हेच सोने आज तुमच्याकडे असते तर तुम्ही थेट लखपती झाले असता. कारण साधारण पाच ते सहा दशकांपूर्वी सोन्याचा भाव फारच कमी होता. तुमच्या आजीने थोडे-थोडे सोने करून ठेवले असते आणि सुदैवाने हेच सोने आज तुमच्याकडे असते तर आज तुमच्याकडे भरपूर सारे पैसे असते. हे कसं शक्य झालं असतं हे समजून घेऊ या. 


50-55 वर्षांपूर्वी सोन्याचा दर काय होता? 


आजपासून साधारण 50 ते 55 वर्षांपूर्वी म्हणजेच साधारण 1970 च्या दशकात सोने फार स्वस्त होते. 1970 साली तुमच्या पूर्वजांनी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार केला असता तर ते साधारण 18,500 रुपयांत तब्बल एक किलो सोनं घेऊ शकले असते. त्याआधी पाच वर्षांआधी पाहायचे झाल्यास म्हणजेच 1965 साली सोन्याचा भाव फक्त  72 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच तेव्हा पाच वर्षांत सोन्याचा दर 20 टक्क्यांनी वाढला होता. 1975 साली देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, तेव्हादेखील सोन्याचा दर 785 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 


देशात जेव्हा अस्थिरता असते तेव्हा सोन्याचा दर वधारतो. 1975 ते 1980 या काळात भारतात मोठी अस्थिरता होती. त्यामुळे साहजिकच या काळात देशात सोन्याचा दर चांगलाच वाढला होता. 1975 साली सोने 785 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून थेट 3,677 रुपए प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. 


आज तुमच्याकडे असते एवढे रुपये 


आता तुमच्या पूर्वजांनी 50 ते 55 वर्षांपूर्वी सोन्यात गुंतवणूक केली असती आणि हेच सोने आज तुमच्याकडे असते तर  तुम्हाला किती रुपये मिळाले असते हे जाणून घेऊ या. आज सोन्याचा सरासरी भाव 72,000 रुपये प्रति 10 ग्रॅम चालू आहे. म्हणजेच आज तुम्हाला 1 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 7,200 रुपये मोजावे लागतात. 50-55 वर्षांपूर्वी तुमच्या पूर्वजांनी 18,500 रुपयांत 1,000 ग्रॅम सोने खरेदी केले असते तर आज त्या सोन्याचे मूल्य तब्बल 72,00,000 रुपये असते. म्हणजेच आज तुम्ही लखपती असता. 


हेही वाचा :


मोठी बातमी! खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 14 पिकांच्या हमीभावात वाढ


राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार मोफत उपचार!


प्रत्येकाकडे 'हा' एक विमा असायलाच हवा, मृत्यूनंतर मुलं, जोडीदाराचा आर्थिक प्रश्न मिटून जाईल!