एक्स्प्लोर

June Rules Change: एक जून 2022 पासून 'हे' 5 नियम बदलणार, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार!

Financial Changes From 1st June 2022: उद्यापासून जून महिना सुरू होत आहे. एक जूनपासून तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

Financial Changes From 1st June 2022: उद्यापासून जून महिना सुरू होत आहे. एक जूनपासून तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. तुमचा ईएमआय महाग होणार आहे, तर तुम्हाला वाहनांचा विमा उतरवण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. एक जूनपासून आणखी बरेच बदल होणार आहेत, जे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण या गोष्टी तुमच्या आर्थिक गणिताशी संबंधित आहे. 

1. SBI Home Loan EMI To Be Costly: तुम्ही नवीन घर घेण्यासाठी SBI कडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक महाग व्याजावर गृहकर्ज मिळेल. ज्यामुळे EMI महाग होईल. SBI ने त्याचा होम लोन-लिंक्ड एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 40 बेस पॉईंट्सने 7.05 टक्क्यांनी वाढवला आहे. तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.65 टक्के + CRP असेल. SBI च्या वेबसाईटनुसार वाढलेले व्याजदर 1 जून 2022 पासून लागू होतील. यापूर्वी एक्सटर्नल बेंचमार्क कर्ज दर (EBLR) 6.65 टक्के होता, तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.25 टक्के होता.

2. Third Party Motor Insurance Premium Hike: जर तुमच्याकडे वाहन असेल तर तुमचा खर्च वाढणार आहे. कारण 1 जूनपासून थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचा प्रीमियम वाढणार आहे. यासंदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे, जी 1 जूनपासून लागू होईल. त्यामुळे कार आणि दुचाकीचा विमा महागणार आहे. अधिसूचनेत सुधारित दरानुसार, 1000 सीसी इंजिन क्षमतेच्या खाजगी कारसाठी प्रीमियम आता 2072 रुपयांच्या तुलनेत 2094 रुपये असेल. 1000 ते 1500 सीसी इंजिन असलेल्या खाजगी गाड्यांसाठी आता प्रीमियम 3221 रुपयांऐवजी 3416 रुपये असेल. तथापि, 1500 सीसी वरील खाजगी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये किरकोळ कपात करण्यात आली आहे आणि ती 7897 रुपयांवरून 7890 रुपयांपर्यंत खाली येईल. त्याचप्रमाणे, 150 ते 350 सीसी पर्यंतच्या दुचाकींसाठी 1366 रुपये प्रीमियम असेल. तर 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकींसाठी हा दर 2804 रुपये असेल.

3. Gold Hallmarking: 1 जून 2022 पासून दुसऱ्या टप्प्यात आणखी काही जिल्ह्यांमध्ये गोल्ड हॉलमार्किंग लागू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील 32 नवीन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग सुरू होणार आहे. 1 जूननंतर देशातील एकूण 288 जिल्ह्यांमध्ये 14, 18, 20, 22, 23, 24 कॅरेट सोन्याचे दागिने हॉलमार्किंगसह विकले जातील. पहिला टप्पा भारतीय मानक ब्युरो (BIS) ने 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये अनिवार्य सोन्याचे हॉलमार्किंगसह सुरू केले होते.

4. Axis Bank बचत खात्याच्या शुल्कात बदल: अॅक्सिस बँकेच्या बचत खात्याच्या शुल्कात बदल: अॅक्सिस बँकेने निम-शहरी आणि ग्रामीण भागातील बचत खात्यांसाठी आणि सॅलरी प्रोग्रॅम अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांसाठी किमान खाते शिल्लक मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जो 1 जूनपासून लागू होईल. सुलभ बचत आणि वेतन कार्यक्रम असलेल्या खात्यांसाठी किमान खाते शिल्लक मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे. तसेच 1 लाख रुपयांची मुदत ठेव ठेवणे आवश्यक असेल. याशिवाय लिबर्टी बचत खात्यातील किमान खाते शिल्लक मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे.

5. India Post Payment Bank: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने म्हटले आहे की, आता आधार सक्षम पेमेंट सिस्टमसाठी Issuer Charge भरावे लागेल. नियमांनुसार, दर महिन्याला पहिले तीन AEPS व्यवहार विनामूल्य असतील. ज्यात AEPS रोख पैसे काढणे, AEPS रोख ठेव आणि AEPS मिनी स्टेटमेंट समाविष्ट आहे. विनामूल्य व्यवहारांनंतर, प्रत्येक रोख पैसे काढणे किंवा रोख ठेवीवर 20 रुपये अधिक GST स्वतंत्रपणे लागू होईल, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारावर 5 रुपये अधिक GST लागू होईल.

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget