एक्स्प्लोर

पितृपंधरवड्यामुळं भाज्यांची मागणी वाढली, बळीराजाला फायदा, कोणत्या भाजीला किती दर? 

पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी (Vegetables Demand) वाढली आहे. त्यामुळं पुण्यातील बाजारात विविध प्रकारच्या भाज्यांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांची वाढ झालीय.

Vegetables Rates News : सध्या पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी (Vegetables Demand) वाढली आहे. त्यामुळं पुण्यातील बाजारात विविध प्रकारच्या भाज्यांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. भाज्यांचे दर आणखी 15 दिवस तेजीत राहणार असून, नवरात्रौत्सवात भाज्यांच्या दरात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, सध्या वाढत जाणाऱ्या भाज्यांच्या दरामुळं शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. 

पितृपंधरवडा सुरू झाल्यानंतर भाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी होत असल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या भाज्यांचे दर तेजीत आहेत. येत्या काही दिवसात भाज्यांच्या मागणीत वाढ होणार आहे. पितृपंधरवड्यात गवार, भेंडी, कारली, देठ, आले, अळू, काकडी या भाज्यांच्या मागणीत वाढ होत आहे. जाणून घेऊयात कोणत्या भाजीला बाजारात किती दर मिळत आहे, याबाबतची माहिती. 

किणत्या भाजीला किलोला किती दर?

गवार - 120 रुपये किलो

भेंडी - 80 रुपये किलो

कारले - 80 रुपये किलो

काकडी - 80 रुपये

देठ- 20 रुपये (एक नग)

अळूची पाने- 20 रुपये जुडी

भाज्यांना आणखी मागणी वाढणार

पुणे मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात पितृपंधरवड्यात लागणार्‍या भाज्यांची आवक पुणे जिल्हा आणि विभागातून होत आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने विक्रीसाठी बाजारात दाखल होत असलेल्या भाज्यांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळेही या भाज्यांना दर मिळत आहे. पितृपंधरवड्याचा कालावधी जसाजसा जवळ येत राहील, तशी भाज्यांनाही आणखी मागणी वाढेल. पितृ-पंधरवाड्यात घरातील दिवंगत वाडवडिलांच्या नावे नैवेद्य दाखवून जेवण घालण्याची परंपरा आहे. ही परंपरा मोठ्या प्रमाणात पाळली जाते. त्यामुळे पितृपंधरवड्यात भाज्यांना मागणी वाढली आहे. 

फळांच्याही मागणीत वाढ

दरम्यान, बाजारात फळांनाही मागणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. पेरू, केळी आणि डाळिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळं घाऊक आणि किरकोळ बाजारात या तीनही फळांच्या दरात वाढ झाली आहे. पेरु आणि केळीच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात डाळिंबाचा प्रतिकिलोचा दर 100 ते 300 रुपये आहे. केळी 40 ते 50 रुपये डझन, तर पेरूचा किलोचा दर 20 ते 50 रुपये  आहे. दरम्यान, सध्या वाढत जाणाऱ्या भाज्यांच्या दरामुळं आणि फळांच्या दरामुळं शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. पुढचे काही दिवस आमखी दर वाढण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या:

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांची रडारड
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांची रडारड
Badlapur encounter सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून; बदलापूर प्रकरणी असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका
सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून; बदलापूर प्रकरणी असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका
इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, त्यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट
इलेक्शनची पेटी येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Siddhivinayak Prasad :प्रसादाच्या टोपलीतल्या उंदरांचा व्हिडीओ व्हायरल, मंदिर प्रशासनाने आरोप फेटाळलेदुपारी 2 च्या हेडलाईन्स:  ABP Majha Marathi News : Headlines 2 PM Headlines : 24 September 2024Akshay Shinde Encounter Van :  अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive VideoAkshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांची रडारड
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांची रडारड
Badlapur encounter सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून; बदलापूर प्रकरणी असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका
सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून; बदलापूर प्रकरणी असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका
इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, त्यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट
इलेक्शनची पेटी येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेला बदलापूरला न्यायचं होतं तर पोलिसांनी गाडी मुंब्य्राच्या दिशेने का वळवली? सुषमा अंधारेंचा सवाल
अक्षय शिंदेला बदलापूरला न्यायचं होतं तर पोलिसांनी गाडी मुंब्य्राच्या दिशेने का वळवली? सुषमा अंधारेंचा सवाल
अनेकवेळा ट्राय करूनही आयपीओ अलॉट होत नाहीये? फक्त 'या' चार ट्रिक वापरा, काम झालंच म्हणून समजा!
अनेकवेळा ट्राय करूनही आयपीओ अलॉट होत नाहीये? फक्त 'या' पाच ट्रिक वापरा, काम झालंच म्हणून समजा!
Akshay Shinde Encounter: बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, अक्षय शिंदेला IPS मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा?
बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, अक्षय शिंदेला IPS मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा?
Embed widget