Upcoming IPO News: येत्या काही दिवसांत तुम्हाला शेअर बाजारातून कमाई करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. एप्रिल-जुलै महिन्यात अनेक कंपन्यांना सेबीने आयपीओसाठी मान्यता दिली आहे. SEBI ने 28 कंपन्यांना 2022-23 या आर्थिक वर्षात एप्रिल-जुलै दरम्यान आपला आयपीओ बाजारात उतरवण्यास मान्यता दिली आहे. या आयपीओद्वारे एकूण 45,000 कोटी रुपये उभे करण्याचे नियोजन आहे.
कोणत्या कंपन्यांना आयपीओसाठी मिळाली मंजुरी?
आयपीओसाठी सेबीची मान्यता मिळालेल्या कंपन्यांमध्ये लाइफस्टाइल रिटेल ब्रँड Fabindia, FIH Mobiles आणि Foxconn Technology Group च्या उपकंपनी- भारत एफआयएच, टीव्हीस सप्लाय चेन सोल्युशन्स, ब्लॅकस्टोन समर्थित आधार हाउसिंग फायनान्स आणि McLeods फार्मास्युटिकल्स अँड किड्स क्लिनिक इंडिया यांचा समावेश आहे.
आयपीओची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही
मर्चंट बँकर्सने सांगितले की, या कंपन्यांनी त्यांच्या IPOची तारीख अजून जाहीर केलेली नाही. या कंपन्या आपल्या आयपीओची तारीख जारी करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. ते म्हणाले की, सध्याची बाजाराची परिस्थिती आव्हानात्मक आहे.
तज्ज्ञांचे काय आहे म्हणणे...
आनंद राठी इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि इक्विटी कॅपिटल मार्केट्सचे प्रमुख प्रशांत राव यांनी सांगितले की, सध्याची बाजाराची परिस्थिती आव्हानात्मक आहे. ज्या कंपन्यांना मान्यता मिळाली आहे, ते आपले आयपीओ लॉन्च करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) आकडेवारीनुसार, एप्रिल-जुलै 2022-23 या कालावधीत एकूण 28 कंपन्यांना आयपीओद्वारे भांडवल उभारणीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 11 कंपन्यांनी आयपीओद्वारे 33,254 कोटी रुपये उभे केले आहेत. यातील मोठा भाग (रु. 20,557 कोटी) एलआयसीच्या आयपीओचा होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
... अन् राकेश झुनझुनवालांच्या अकासा एअरचं पहिलं विमान आकाशात झेपावलं!
33,254 कोटी रुपये उभे केले आहेत. यातील मोठा भाग (रु. 20,557 कोटी) एलआयसीच्या आयपीओचा होता.