Economic Crisis : कोरोना (Corona) महामारीनंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये सातत्यानं घसरण होत असून भारताचे शेजारील देश कर्ज घेण्यात आघाडीवर आहेत. कर्ज घेण्याच्या बाबतीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर, श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आणि आता बांगलादेश (Bangladesh) तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. बांगलादेश आता कर्ज घेण्यासाठी IMF सोबत चर्चा सुरू करणार आहे. 


बांगलादेशनं काही दिवसांपूर्वी आयएमएफकडे कर्जासाठी अर्ज पाठवला होता. जगभरातील वाढत्या आर्थिक संकटात बांगलादेश हा महागाई आणि आर्थिक संकटाच्या (Economic Crisis)  गर्तेतून बाहेर येण्यासाठी IMF चा दरवाजा ठोठावणारा तिसरा दक्षिण आशियाई (South Asian Country) देश बनला आहे. 


कोणी किती कर्ज घेतलं?


जुलै 2022 मधील आकडेवारीनुसार, पाकिस्ताननं आतापर्यंत 5194 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेनं जागतिक बँकेकडून 600 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशनं जुलै 2022 पर्यंत परकीय चलनाच्या साठ्यातून 762 दशलक्ष डॉलर्स कर्ज घेतलं आहे. कर्ज घेण्याच्या बाबतीत अफगाणिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्ताननं आतापर्यंत परकीय चलनाच्या साठ्यातून 378 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे. तर या यादीत म्यानमार पाचव्या आणि नेपाळ सहाव्या क्रमांकावर आहे.


श्रीलंकेतील आर्थिक संकट आणखी गडद 


श्रीलंकेच्या सरकारनं परकीय चलन साठ्यातून जे कर्ज घेतलं आहे, ते सध्या वाढून आता 51 अब्ज डॉलर्स इकतं झालं आहे. यातील 6.5 अब्ज डॉलर चीनचं असून दोन्ही देश त्यावर पुनर्विचार करत आहेत. श्रीलंकेला यावर्षीच्या कर्जासाठी 874 अब्ज डॉलर्स द्यावे लागतील. परकीय चलन साठ्यातून श्रीलंकेला कर्ज देण्याचं मान्य केलं आहे. बांगलादेशनं परकीय चलनाच्या साठ्यातून आतापर्यंत 762 अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे, बांगलादेश एवढं कर्ज घेणारा भारताचा तिसरा शेजारील देश आहे. 


बांगलादेशकडून तीन वर्षांत 4.5 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी 


बांगलादेशचं वृत्तपत्र द डेली स्टारनं दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशनं तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 4.5 बिलियन डॉलर्सचं कर्ज मागितलं आहे. बांगलादेशच्या शेख हसीना वाजेद सरकारनं आयएमएफकडे जाण्याचा निर्णय परकीय चलन साठ्यात मोठी घट झाल्यानंतर घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक वायूसह इतर आयातींच्या बिलात झपाट्यानं झालेली वाढ आणि निर्यातीतील घसरण यामुळे बांगलादेशही परकीय चलनाच्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. 


कोरोना महामारीमुळे आर्थिक संकट अधिक गडद 


जगभरात कोरोनानं हैदोस घातलाय. अद्यापही कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. अशातच कोरोना महामारीनंतर जगातील जवळपास 90 देशांत आर्थिक संकट गडद होत चाललं आहे. यापैकी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पण आयएमएफचेही हात बांधले गेलेले आहेत. आयएमएफ सर्वच देशांना कर्ज देऊ शकत नाही. सर्व देशांपैकी काहींची विनंती मान्य करत त्यांना कर्ज देण्याची तयारी आयएमएफनं दर्शवली आहे. 


IMF कडे सदस्य देशांना एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत कर्ज देण्याची क्षमता आहे आणि आतापर्यंत त्यांनी 250 अब्ज डॉलर्सचं कर्ज देण्याचं ठरवलं आहे. IMF अनेकदा कठोर अटींसह कर्ज देतं. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या अटी बऱ्याचदा वादाचं कारण ठरतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bangladesh Fuel Prices Hike : श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशातही आर्थिक संकट; पेट्रोल-डिझेलच्या दरांत 50 टक्क्यांची वाढ