Reliance Industries Limited : मुकेश अंबानींच्या कंपनीचा दबदबा, फक्त 5 तासात सव्वा लाख कोटींची कमाई, शेअर्स विक्रमी पातळीवर
Reliance Industries Limited : बीएसईवर, रिलायन्सच्या शेअरची किंमत 6.90 टक्क्यांनी वाढून 2897.40 या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. दुसरीकडे, निफ्टी 50 इंडेक्सवर RIL स्टॉक टॉप गेनर राहिला.
Reliance Industries Limited : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries Limited) शेअरच्या किंमतीमध्ये विक्रमी उच्चांक सुरुच आहे. आज (29 जानेवारी) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरच्या किंमतींनी उच्चांक गाठला. एका बाजूने शेअर किंमती वाढत असतानाच कंपनीचे (Reliance Industries) मार्केट कॅप सुद्धा 19.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. रिलायन्सच्या शेअर्सनी बीएसईवर 7 टक्क्यांच्या वाढीसह 2897.40 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. बीएसईवर, रिलायन्सच्या शेअरची किंमत 6.90 टक्क्यांनी वाढून 2897.40 या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. दुसरीकडे, निफ्टी 50 इंडेक्सवर RIL स्टॉक टॉप गेनर राहिला. निफ्टी 50 च्या वाढीमध्ये RIL समभागांनी सुमारे 89 अंकांचे योगदान दिले.
5 तासात 1.25 लाख कोटींची कमाई (Reliance Industries)
रिलायन्स इंडस्ट्रीजने अवघ्या पाच तासांमध्ये 1.25 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. कंपनीच्या शेअर्सने दुपारी सव्वा दोनच्या सुमारास विक्रमी उच्चांक गाठला. तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 19,59,370.53 कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी कंपनीचे मार्केट कॅप 18,33,737.6 कोटी रुपये होते. म्हणजेच या कालावधीत कंपनीला 125632.93 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप बजेटपूर्वी 20 लाख कोटींच्या पुढे जाऊ शकते.
मार्केट कॅपमध्ये 285 मिनिटांत 1.25 लाख कोटी रुपयांची वाढ
दरम्यान, निफ्टी 50 निर्देशांक 303.70 अंकांनी वाढून 21,734.55 वर व्यवहार करत आहे. या वाढीने रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये 285 मिनिटांत 1.25 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 19.60 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.
रिलायन्सचे शेअर्स विक्रमी पातळीवर
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2900 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. हा एक विक्रम आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स सुमारे 7 टक्क्यांच्या वाढीसह 2,899.40 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. तथापि, कंपनीचे शेअर्स 6.70 टक्क्यांच्या वाढीसह 2891.95 रुपयांवर व्यवहार करत आहेत. आज कंपनीचे शेअर्स 2713.20 रुपयांवर उघडले. गेल्या एका महिन्यात रिलायन्सच्या शेअर्समध्ये सुमारे 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गेल्या तीन महिन्यांत या शेअरमध्ये 24 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रिलायन्सच्या शेअर्सने 3 वर्षांत 53 टक्के परतावा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या