एक्स्प्लोर

TCS New Rule: परदेशातील क्रेडीट कार्डद्वारे खर्चावरील TCS ची आकारणी आता 1 ऑक्टोबरपासून

TCS Rule:प्रति व्यक्ती 7 लाख रुपये प्रति व्यक्ती LRS अंतर्गत भरलेल्या परदेशी टूर पॅकेज खर्चावर कोणतेही TCS देय होणार नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. नवीन टीसीएस नियम आता 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे.

TCS New Rule: सरकारने TCS (Tax Collection At Source) बाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. आता TCS चा नवा नियम 1 जुलै 2023 ऐवजी 1 ऑक्टोबर 2023 रोजी लागू होईल. अंमलबजावणीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवल्यामुळे, स्त्रोतावरील कर संकलनाबाबतचा जुना नियम लागू राहणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

दरवर्षी 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक फॉरेन रेमिटन्सवर TCS  भरावे लागणार नाही. याबाबत, अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे.  प्रति व्यक्ती 7 लाख रुपये प्रति व्यक्ती LRS अंतर्गत भरलेल्या परदेशी टूर पॅकेज खर्चावर कोणतेही TCS देय होणार नाही. मात्र, या रकमेपेक्षा जास्त खर्च केल्यावर वाढीव टीसीएस भरावा लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना फॉरेन रेमिंटे्सवर टीसीएस दर वाढवण्याची घोषणा केली होती. सध्या  LRS अंतर्गत फॉरेन रेमिंटेसवर फक्त 5 टक्के टीसीएस आकारला जातो. आता, यामध्ये वाढ करण्यात आली असून 20 टक्के इतका करण्यात आला आहे. काही बाबतीत सवलत देण्यात आली आहे. वाढीव दर हे 1 जुलै 2023 पासून लागू होणार होते. सध्या याला 3 महिन्यांसाठी वाढवण्यात आले आहे. एक ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. 

सरकारने टीसीएस दर कमी करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. क्रेडिट कार्डद्वारे परदेशात कोणतीही रक्कम खर्च करण्यावर टीसीएस दरात कोणतीही कपात केली जाणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. केवळ सरकारने टूर पॅकेजसह परदेशात पैसे पाठवण्यासाठी 20 टक्के दराने TCS कपातीची अंमलबजावणी तीन महिन्यांसाठी म्हणजे 1 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामागील आपली भूमिका सांगताना, अर्थ मंत्रालयाने म्हटले होते की FEMA कायद्यात बदल करण्याचा उद्देश भारतीय रिझर्व्ह बँकेच्या LRS (Liberalised Remittance Scheme) च्या कक्षेत आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड्समधून परदेशात होणारा खर्च आणणे हा आहे. त्याशिवाय, क्रेडिट कार्डद्वारे पाठवलेल्या रकमेच्या कर संबंधित बाबींमध्ये एकसमानता आणणे हा आहे.

वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, परकीय चलन व्यवस्थापन (FEMA) (चालू खाते व्यवहार) (सुधारणा) (Foreign Exchange Management (Current Account Transactions) (Amendment) Rules 2023 नुसार, क्रेडिट कार्डद्वारे परदेशात केलेला खर्च देखील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या LRS योजनेमध्ये समाविष्ट केला आहे. यामुळे परदेशात खर्च केलेल्या रकमेवर कर संकलन (TCS) करणे शक्य होईल. टीसीएस देणारी व्यक्ती करदाता असेल तर आयकर अथवा अॅडव्हान्स टॅक्सची माहिती देऊन क्रेडिटचा दावा करू शकते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget