मुंबई : सध्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. लवकरच हे दाम्पत्य घटस्फोट घेऊन विभक्त होणार आहे, असे सांगितले जात आहे. मात्र या वृत्ताला अद्याप कोणताही ठोस आधार नाही. काही दिवसांपूर्वी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्यादेखील घटस्फोटाची चर्चा चालू होती. दरम्यान, आता घटस्फोटानंतर पत्नीला मिळालेल्या पैशांवर कर लागतो का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे पोटगीतून मिळालेल्या पैशांवर कर द्यावा लागतो का? करासंबंधीचा नियम काय आहे? हे जाणून घेऊ या.


पोटगी म्हणजे काय? 


घटस्फोटानंतर पोटगीत मिळालेल्या पैशांवर कर लागतो का, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. घटस्फोटानंतर मिळणाऱ्या या पैशांना पोटगी म्हटलं जातं. विभक्त झालयानंतर पत्नीला चरितार्थासाठी ही रक्कम दिली जाते. हिंदू विवाह कायद्यानुसार पत्नीला ही पोटगी दिली जाते. पोटगीरुपी ही रक्कम पतीकडून दिली जाते. काही प्रकरणांत न्यायालय पतीलादेखील पोटगी देऊ शकते. म्हणजेच न्यायालय पत्नीने पतीला पोटगी द्यावी, असादेखील निर्णय देऊ शकते.  


अशी ठरवली जाते पोटगी


पोटगी ठरवण्याचे नेमके असे कोणतेही सूत्र नाही. पती आणि पत्नी यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पोटगी ठरवली जाते. दोघेही किती रुपये कमवतात, दोघांकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता किती आहे, मुले कोणाकडे राहणार आहेत अशा अनेक बाबी विचारात घेऊन पोटगी ठरवली जाते. एकरकमी किवा प्रतिमहिना, प्रत्येक सहा महिन्यांनी पोटगी देता येते. 


कर कधी लागतो? 


प्राप्तिकर कायद्यात पोटगीत कोणतीही वेगळी तरतूद नाही. त्यामुळे पोटगी कशी दिली जात आहे, त्यावरून कर ठरवला जातो. पत्नीला एकरकमी पोटगी दिली जात असेल तर त्याला प्राप्तिकर कायद्याच्या भाषेत कपिटल रिसिप्ट म्हटले जाते. यावर कर लागत नाही. मात्र महिन्याला किंवा प्रत्येक सहा महिन्याला पोटगी देण्याचे ठरल्यावर प्राप्तिकर कायद्याच्या नजरेतून ही रक्कम रिव्हेन्यू रिसिप्ट मानली जाते. यावर कर आखारला जातो. पोटगी मिळणारी व्यक्ती कोणत्या टॅक्स स्लॅबमध्य येते, त्यानुसार पोटगीवर किती कर आकारायचा हे ठरवले जाते.


हेही वाचा :


पेटीएमचा शेअर सुस्साट! एका दिवसात 5 टक्क्यांची वाढ; भविष्यातही चांगला परतावा देणार?


शुक्रवारी 'या' 10 पेनी स्टॉक्सचा राहणार बोलबाला? गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल!


कर्ज ते म्यूच्यूअल फंड, सर्व कामे एकाच अ‍ॅपमध्ये, मुकेश अंबानींच्या रिलायन्स ग्रुपने लॉन्च केलं नवं अ‍ॅप!