मुंबई : गेल्या काही वर्षांत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाने वेगवेगळ्या क्षेत्रात धडाकेबाज कारवाई केलेली आहे. जिओच्या माध्यमातून त्यांनी टेलकॉम क्षेत्रातही क्रांतीकारक निर्णय घेतले आहेत. त्यांची रिलायन्स उद्योग समुहाची जिओ फायनान्शियल ही कंपनी गेल्या वर्षी शेअर बाजारावर लिस्ट झाली होती. दरम्यान त्यांनी आता जिओ फायनान्शियलने एक नवे अ‍ॅप लाँन्च केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून जिओ फायनान्शियलच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना यूपीआय पेमेंट करणे, कर्ज घेणे यापासून ते म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करणे इथपर्यंतची कामे करता येतील.  


अॅप लवकरच पूर्ण शक्तीने काम करणार


जिओ फायनान्शियल सर्व्हिसच्या या नव्या अ‍ॅपचे नाव ‘जिओ फायनान्स’ असे आहे. गुरुवारी हे अॅप सार्वजनिक करण्यात आले. सध्या या अ‍ॅपचे बीट व्हर्जन लॉन्च करण्यात आले असून ते प्रायोगिक तत्त्वावर चालवले जात आहे. या अ‍ॅपमधील बग्स, ग्लिचेस आदींची माहिती मिळाल्यानंतर हे पूर्ण शक्तीने काम करणार आहे. 


हे अ‍ॅप म्हणजे चालती-फिरती बँक 


जिओ फायनान्स बँकेच्या माध्यमातून अनेक कामे करता येतील. ही एक चालती-फिरती बँक असेल असं म्हटलं जातंय. डिजिटल बँकेच्या सर्व सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळतील. यामध्ये यूपीआय पेमेंट, ट्रान्जेक्शन, वेगवेगळी बिलं देणे, विम्यासाठी अर्ज करणे आदी सुविधा या अॅपच्या माध्यमातून मिळतील. विशेष म्हणजे या अ‍ॅपमध्ये बचतीचेही पर्याय उपलब्ध असतील. 


म्यूच्यूअल फंडातही करता येणार गुंतवणूक


जिओ फायनान्सच्या म्हणण्यानुसार भविष्यात या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना कर्ज दिले जाईल. तसेच ग्राहक म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतील. फायनान्सच्या संदर्भात हे एक सुपर अ‍ॅप असेल, असा दावा जिओ फायनान्सकडून करण्यात आला आहे. 


जिओ पेमेंट्स बँक अकाउंट चालू करता येणार 


जिओ फायनान्सच्या माध्यमातून ग्राहकांना तत्काळ डिजिटल खाते खोलता येणार आहे. या अ‍ॅपवर ग्राहक जिओ पेमेंट्स बँक अकाऊंट खोलू शकणार आहेत. हे बँक खाते पेटीएम पेमेंट्स बँक खात्याप्रमाणेच काम करेल. 


हेही वाचा :


मॉडलिंग, अभिनय ते 'डीजे वाले बाबू'ची हिरोईन; हार्दिक पांड्याची पत्नी नताशा किती कोटींची मालकीण?


एसी तयार करणारी 'ही' कंपनी जोमात, फक्त पाच दिवसांत दिले 47 टक्के रिटर्न्स!


आरोग्य विमा धारकांना मोठा दिलासा, IRDAI च्या 'या' नव्या निर्णयामुळे आता 3 तासांत क्लेम सेटलमेन्ट!