Thane, Mumbai Local Mega Block Updates: मुंबई : ठाणे स्थानकात (Thane Railway Station) स्थानकात 62 तासांच्या मेगाब्लॉकला (Mega Block) मध्यरात्रीपासूनच सुरूवात झाली आहे. मुंबईहून (Mumbai News) कल्याणकडे (Kalyan) जाणाऱ्या फास्ट मार्गावर 62 तासांचा, तर मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर (Mumbai Slow Local Train) 12 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर यामुळे वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे. गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहे. आज कामाचा दिवस असल्यानं ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. कल्याण डोंबिवली ठाणे या प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. सकाळची कामाची वेळ, उकाडा आणि गाड्या उशिरा आल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. आज मध्य आणि हार्बर मार्गावरील 161 लोकल रद्द आहेत, सध्या ठाणे स्थानकात 20 मिनिटांनी एक अशी मुंबईकडे जाणारी लोकल येत आहे. एकच ठिकाणी फास्ट आणि स्लो लोकल येत असल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ आहे, दुपारनंतर जेव्हा ठाणे स्थानकात मुंबईकडे जाणारा स्लो ट्रॅक सुरू होईल, तेव्हा यात फरक पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे. 


मेगाब्लॉकदरम्यान ठाणे स्थानकावरुन कशा धावतील गाड्या? 


आज सकाळी ठाणे स्थानकावर पेवर ब्लॉकच काम सुरू करण्यात येणार आहे. फलाट क्रमांक पाचचं रुंदीकरण होणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरुन सगळी लोकल ट्रेन अप आणि डाऊन मार्गे स्लो ट्रॅकनी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वरून धावणार आहेत. तसेच, मेल एक्सप्रेस गाडी 6 आणि 7 वर अप आणि डाऊन मार्गावर धावणार आहे. लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील तीन दिवस 63 तासांच्या मेगाब्लॉकमुळे त्रास सहन करावा लागणार आहे.


ठाणे स्थानकांतील कोणत्या कामासाठी मेगाब्लॉक? 


ठाणे स्थानकात सुरू झालेल्या मेगा ब्लोकचे काम प्रगतीपथावर आहे, 5 नंबर फलाताची रुंदी वाढवण्याचे काम करण्यात येत आहे, त्यासाठी आधी मुंबईहून कल्याण कडे जाणारा जलद मार्गिकेचा रुळ बाजूला सरकवणं गरजेचं होतं, रात्रीपासून आतापर्यंत हे काम पूर्ण करण्यात आलं आहे, रुळ एका बाजूला सरकवण्यात आले आहेत, आता रुळावरील ओव्हर हेड वायर, बाजूची सिग्नल यंत्रणा, पॉइंट्स सरकवले जातील, रुळाच्या खाली खडी टाकून ट्रॅक मजबूत केला जाईल, त्यानंतर आधी पासून बनवून ठेवण्यात आलेले प्री कास्ट ब्लॉक्स आणून नवीन तयार झालेल्या जागेवर ठेवण्यात येतील, अश्याप्रकरे रुंदी वाढवली जाईल, 


सध्या ठाणे स्थानकात 2 नंबर म्हणजे मुंबईहून कल्याण कडे जाणारा धीमा मार्ग आणि कल्याण हून मुंबईकडे जाणाऱ्या 6 नंबर जलद मार्ग सुरू आहे, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या 7 आणि 8 नंबर फलाटावर वळवण्यात आल्या आहेत, 5 नंबर म्हाजेच कल्याण कडे जाणारा जलद ट्रक आणि मुंबईकडे जाणार धीम्या मार्ग सध्या बंद आहे.


रेल्वेच्या मदतीला धावली 'बेस्ट', जादा गाड्या चालवण्याचा निर्णय 


मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे बेस्ट प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महा जम्बो ब्लॉकचा परिणाम सकाळपासूनच सर्व रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासनाच्या वतीने बस सोडल्या गेल्या आहेत. याचा आढावा कुर्ला बेस्ट आगारातून घेतला आमचे प्रतिनिधी यांनी



  • सी एस एम टी ते दादर स्थानक 4 बसेस 80 फेऱ्या 

  • कुलाबा आगर ते भायखळा स्थानक 4 बसेस 80 फेऱ्या 

  • कुलाबा अगर ते वडाळा स्थानक 4 बसेस 72 फेऱ्या 

  • कुलाबा आगर ते वडाळा स्थानक चार बसेस 30 फेऱ्या 

  • सी एस एम टी ते धारावी आगार 5 बसेस 30 फेऱ्या 

  • डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते प्रतीक्षा नगर पाच बसेस 20 फेऱ्या 

  • बॅकबे आगार ते एम एम आर डी ए वसाहत माहुल 5 बसेस 20 फेऱ्या 

  • कुलाबा आगार ते खोडदाद सर्कल पाच बसेस 30 फेऱ्या 

  • सी एस एम टी ते भायखळा स्थानक तीन बसेस 24 फेऱ्या 

  • राणी लक्ष्मी चौक ते दादलानी पार्क पाच बसेस 20 फेऱ्या 

  • सीएसएमटी ते भायखळा स्थानक पाच दुमजली बसेस 40 फेऱ्या 

  • अँटॉप हिल ते वीर कोतवाल उद्यान पाच बसेस 40 फेऱ्या