पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर (Pune Porsche Car Accident)  नियमांचं उल्लघंन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुण्यासारखा प्रकार रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि CCTV च्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार व रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जातायेत का? हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अॅक्टिव्ह मोड मध्ये आली आहे. शहरातील रस्ते अन् गल्ली-बोळातून ते दुचाकीवर रात्र गस्त घालतायेत. या दरम्यान येणारे पब, हुक्का पार्लर आणि बारमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का? अल्पवयीन मुलं कुठं गैरकृत्य करतायेत का? यावर आता पोलीस करडी नजर ठेवत आहेत .


अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जातायेत का? 


 पोर्शे कार अपघातानंतर पिंपरी चिंचवड पोलीस खडबडून जागी झालीये, ती अॅक्टिव्ह मोड मध्ये आलीये. त्यांच्याकडून रात्री  कारवाई सुरु आहे.  पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जातायेत का? हा मुद्दा ऐरणीवर आला. त्यासोबतच पोलीस हे रोखण्यासाठी काही पावलं उचलत आहेत का? असा प्रश्न ही विचारला जाऊ लागला. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी रात्री अशी गस्त सुरू केलीये. या गस्ती दरम्यान पोलीस पब, हुक्का पार्लरमध्ये धाडी टाकतायेत. तिथं अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का? याची छाननी करतीये. त्यासोबतच जिथं लहान-लहान मुलांचे अड्डे असतात, यावर ही करडी नजर ठेवत आहे.  


कारवाईत सातत्य राहणार का?


 पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या मोहिमेने व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या अल्पवयीन मुलांना नक्कीच आळा बसेल. मात्र या कारवाईत सातत्य राहणार का? हा खरा प्रश्न आहे. 


राज्यात 96 बार अॅण्ड रेस्टॉरंटवर कारवाई


पुणे पॉर्शे प्रकरणानंतर राज्यभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुणे, मुंबई आणि ठाण्यात कारवाईंचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यात 96 बार अॅण्ड रेस्टॉरंट, परमिट रूमवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तर किरकोळ नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 56 बारवर  राज्य उत्पादन शुल्क विभागाने दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यात 10 दिवसात 243 व्यवस्थापनाची तपासणी करण्यात आली असून 60 बार अॅण्ड रेस्टोरंट, परमिट रूम बंद करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मुंबई व ठाण्यात एकूण 34 बार व इतर व्यवस्थापनवर कारवाई केल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.


हे ही वाचा :


पुणे अपघात प्रकरणात बदलेले ब्लड सॅम्पल लाडोबाच्या आईचेच? लेकासाठी ढसाढसा रडणारी शिवानी अग्रवाल बेपत्ता