(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकीकडं भारत-पाक सामना सुरु, दुसरीकडं काही तासातच 3509 कंडोमची विक्री
शनिवारी झालेल्या विश्वचषकातील एकदिवसीय सामन्यात भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यादरम्यान, स्विगी इंस्टामार्टवर कंडोमची प्रचंड विक्री झाली होती.
Condom Sale On Swiggy: काल (14 ऑक्टोबर) दिवसभर भारत-पाकिस्तान सामन्याचा उत्साह पाहायला मिळाला. भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यादरम्यान, स्विगी इंस्टामार्टवर कंडोमची प्रचंड विक्री झाली होती. सामन्यादरम्यान लोकांनी काही तासांतच 3 हजार 509 कंडोम ऑर्डर केले होते. याशिवाय भरपूर बिर्याणीही ऑर्डर केल्या होत्या. दुपारी दोन वाजल्यानंतर स्विगीला दर मिनिटाला 250 बिर्याणीच्या ऑर्डर मिळाल्या होत्या.
भारत-पाक सामन्यानंतर रेस्टॉरंट, बार, पब, स्विगी यांची भरपूर कमाई
भारत-पाकिस्तान यांच्यातील शानदार सामना पाहण्याची संधी कोणालाही सोडायची नव्हती. या संधीचा फायदा घेण्यासाठी प्रत्येकाने आपापली तयारी केली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाखांहून अधिक लोकांनी हा सामना प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहिला. तर काही खेळाडूंनी स्टेडियमबाहेरही घरातच या सामन्याचा आनंद लुटला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. त्यानंतर केवळ स्टेडियमच नाही तर रेस्टॉरंट, बार, पब, स्विगी या सर्वांनी भरपूर कमाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान स्विगीची प्रचंड विक्री झाली होती. स्विगीने सांगितले की, काही तासातच त्याच्या इन्स्टामार्टमधून हजारो कंडोम विकले गेले. ऑनलाइन किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी इंस्टामार्टला सामन्यादरम्यान 3509 कंडोमची ऑर्डर मिळाली होती. याशिवाय स्विगी-झोमॅटोकडून दर मिनिटाला शेकडो बिर्याणी, मिठाई, चॉकलेट्स आणि चिप्सची ऑर्डर दिली जात होती.
काही तासांत 3509 कंडोम विकले गेले
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान सुमारे 3509 कंडोमच्या ऑर्डर स्विगी इंस्टामार्टवर देण्यात आल्या होत्या. स्विगीनेच ट्वीटरवर याबाबतची माहिती दिली आहे. स्विगीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 3509 कंडोम ऑर्डर केले होते. काही खेळाडू आज मैदानाबाहेर खेळत आहेत. यावर कमेंट करताना आणखी एका यूजरने लिहिले की, ते किमान खेळत तर आहेत. पाकिस्तानसारखे शरण आले नाही.
दर मिनिटाला 250 बिर्याणीची ऑर्डर
केवळ कंडोमच नाही तर लोकांनी मॅचदरम्यान मोठ्या प्रमाणात बिर्याणीची ऑर्डर दिली. स्विगीने शनिवारी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान दर मिनिटाला 250 पेक्षा जास्त बिर्याणीच्या ऑर्डर मिळाल्या. सामना सुरु झाल्यापासून स्विगीला दर मिनिटाला 250 बिर्याणीच्या ऑर्डर देण्यात आल्या. कंपनीने सांगितले की, चंदिगडमधील एका कुटुंबाने एकाच वेळी 70 बिर्याणी ऑर्डर केल्या. असे दिसते की ते आधीच उत्सव साजरा करत होते.
या वस्तूही मागविण्यात आल्या होत्या. याशिवाय भारतीयांनी सामन्यादरम्यान 1 लाखांहून अधिक कोल्ड्रिंक्स ऑर्डर केले होते. सामन्यादरम्यान ब्लू ले, ग्रीन लेजची सुमारे 10,916 आणि 8,504 पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: