एक्स्प्लोर

Stock Market Opening : शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 500 अंकांनी वर, तर निफ्टी 17700 पार

Stock Market Opening : भारतीय शेअर बाजारात मोठ्या तेजीनं व्यवसाय सुरू झाला. आयटी शेअर्समधील सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या हालचाली दिसून आल्या.

Stock Market Opening : शेअर बाजारात आज मोठी उसळी (Share Market) पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स निफ्टीच्या वरच्या श्रेणीत व्यवहार करत आहे. निफ्टीनं आज 1 टक्क्यांच्या जबरदस्त वाढीसह व्यवहार सुरू केला आहे. BSE सेन्सेक्स 503.16 अंकांच्या म्हणजेच, 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 59,320.45 वर उघडला. याशिवाय, NSE च्या निफ्टीनं 176.90 अंक किंवा 1.01 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,711.65 वर व्यापार सुरू केला आहे. 

निफ्टीची परिस्थिती काय? 

सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये निफ्टी 17700 च्या खाली आला. दरम्यान, सध्या 50 पैकी 46 शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर उर्वरित 3 शेअर्स घसरले आहेत. तर एका शेअरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे, जर बँक निफ्टीबद्दल बोलायचं झालं तर, तो 411.10 अंकांच्या वाढीसह 1.07 टक्क्यांच्या तेजीसह 38,698 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

सेक्टोरियल इंडेक्समध्ये काय परिस्थिती? 

निफ्टीच्या सर्व सेक्टोरियल इंडेक्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सर्वाधिक 1.93 टक्यांची उसळी आयटी शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे. तर 1.15 टक्के रिअॅलिटी शेअर्सच्या किमतींतही वाढ झाली आहे. तर बँक-पीएसयू बँक 1.14 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. ऑईल आणि गॅसचे शेअर्स आणि ऑटो-फार्मा सेक्टरमधील शेअर्समध्येही वाढ झाली आहे. 

आजचे कोणते शेअर्स वाढले? 

निफ्टीमध्ये आज ज्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा 2.82 टक्क्यांनी वर आहे. इंडसइंड बँक 2.50 टक्क्यांनी वर आहे. विप्रोनं 2.23 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. ICICI बँक 1.94 टक्क्यांच्या मजबूतीसह व्यवहार करत आहे आणि TCS मध्ये 1.84 टक्क्यांची वाढ नोंदवली जात आहे. 

आज कोसळलेल्या शेअर्सची स्थिती 

टाटा कंज्यमूरचे शेअर्स सुमारे 1.9 टक्क्यांनी घसरले आहेत. हिंडाल्कोमध्ये 0.28 टक्क्यांनी आणि टाटा स्टीलमध्ये 0.14 टक्क्यांची पडझट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एनटीपीसी कोसळला आहे. 

प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची परिस्थिती काय? 

आज प्री-ओपनिंगमध्येही बाजाराची सुरुवात चांगली झाली होती. SGX Nifty मध्ये 195.50 अंक म्हणजेच, 1.11 टक्क्यांनी 17750 च्या पातळीवर झेप घेतली. BSE सेन्सेक्स 206.81 अंकांच्या वाढीसह 59024 वर उघडला. NSE चा निफ्टी 90.25 अंकांनी वाढून 17623.10 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Gold Rate Today : रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Mossad Agents : फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
BMC Recruitment 2024 : सुवर्णसंधी, मुंबई महापालिकेत निरीक्षकपदाची भरती, 92 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, मुंबई महापालिकेत निरीक्षकपदाची भरती, 92 हजारांपर्यंत पगार मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut News : विधानसभेच्या जागावाटपाबाबत संजय राऊत यांच्यासोबत Exclusive बातचीत #abpमाझाJalna Vadigodri Andolan : मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी; पोलिसांकडून नियंत्रणएबीपी माझा मराठी हेडलाईन्स  04 PM TOP Headlines 04 PM 21 September 2024एबीपी माझा मराठी हेडलाईन्स  03 PM TOP Headlines 03 PM 21 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Mossad Agents : फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
BMC Recruitment 2024 : सुवर्णसंधी, मुंबई महापालिकेत निरीक्षकपदाची भरती, 92 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, मुंबई महापालिकेत निरीक्षकपदाची भरती, 92 हजारांपर्यंत पगार मिळणार
Pune Airport Renamed: पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
Maratha vs OBC : वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
नादच खुळा...  इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
नादच खुळा... इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
Embed widget