एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आरारारा... खतरनाक! 'या' पेनी स्टॉकने पाडलाय पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांना दिले तब्बल 11000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स

सध्या अनसे अनेक पेनी स्टॉक्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परावा देत आहेत. पण कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याआधी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

मुंबई : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळाले. सध्या मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स हा 80604.97 वर पोहोचला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक 24606.90 वर पोहोचलाय. दरम्यान, सध्या बाजार पुन्हा सावरल्यामुळे काही पेनी स्टॉक्स सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. यामध्ये अशाच एका पेनी स्टॉकचा समावेश असून गेल्या काही दिवसांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. सध्या या स्टॉकचे मूल्य हे 15 रुपयांपेक्षाही कमी आहे.  

मेडिकल डिस्पोजेबल, फार्मास्यूटिकल आणि फूड अँड बेवरेज पॅकेजिंगसाठी माउल्ड तयार करणाऱ्या या कंपनीचे नाव गुजरात टुलरूम आहे. या कंपनीचा शेअर पेनी स्टॉक श्रेणीत मोडतो. भांडवली बाजाराच्या तुलनेत हा स्टॉक नॅनो कॅप कंपनींच्या श्रेणीत मोडतो. सध्या या स्टॉकचे मूल्य 14.86 रुपये आहे. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 173.36 कोटी रुपये आहे.  

बुधवारी लागले होते अपर सर्किट 

बुधवारी गुजरात टुलरूम या शेअरला अपर सर्किट लागले होते. बुधवारी हा शेअर 4.94 टक्क्यांनी वाढून 14.86 रुपयांवर बंद झाला होता. हे मूल्य गेल्या तीन महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. या शेअरचे गेल्या 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य 45.95 रुपये होते.

सध्या शेअरच्या मूल्यात घट 

सध्या या शेअरने दिलेल्या रिटर्न्सचा अभ्यास करायचा गेल्या काही महिन्यांत या शेअरने चांगले रिटर्न्स दिलेले नाहीत. गेल्या एका आठवड्यात या शेअरने 3.12 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहे. तर एका महिन्याच्या तुलनेत गुंतवणूकदारांचे 1.91 टक्के आणि 3 महिन्यांच्या तुलनेत 34.33 टक्क्यांचे नुसकसान झालेले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून या शेअरच्या मूल्यात साधारण 60 टक्क्यांनी घसरण झालेली आहे.

10 वर्षांत 11 हजार टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स 

गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरचे मूल्य घसरलेले असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करायचा झाल्यास, या कंपनीने गेल्या दहा वर्षांत 11 हजार टक्क्यांपेक्षाही अधिक रिटर्न्स दिलेले आहेत. गेल्या एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिलेले आहेत. तर दोन वर्षांच्या गुंतवणुकीत या कंपनीने 1,240 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. 3 वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 2,150 टक्क्यांनी, तर 5 पाच वर्षांत 3,440 टक्के, 10 वर्षांत 11,330 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. सध्या या कंपनीला 150 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळालेली आहे. त्यामुळे भविष्यात या कंपनीच्या शेअरचे मूल्य आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Embed widget