Employees Laid Off:  देशातील स्टार्टअप उद्योगांसाठीचे चांगले दिवस सरले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या वर्षात स्टार्टअप कंपन्यांनी 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीमधून कमी करण्यात आले. यामध्ये मोठ्या दिग्गज, नावाजलेल्या स्टार्टअप कंपन्यांचा समावेश आहे. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. 


या अहवालानुसार, मागील काही काळापासून स्टार्टअप समोर निधीची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे कंपनीच्या आगामी वाटचालीसाठी नवीन रणनीती आखण्यावर विचार सुरू झाला आहे. काही गुंतवणुकदारांकडून स्टार्टअप संस्थापकांसोबत चर्चा सुरू आहे. वर्ष 2022 मध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामध्ये कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. बाजारात विक्रीचा दबाब वाढला असून गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढली जात आहे. 


स्टार्टअप कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर निधीचा तुटवडा जाणवत आहे. स्टार्टअपमधील गुंतवणूक ही कमी होत आहे. पहिल्या तिमाहीत भारतीय स्टार्टअप कंपन्यांना 11.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळाली. या दरम्यान,  13 युनिकॉर्न निर्माण झाले आहेत. एप्रिल महिन्यात 3.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. यामध्ये कोणताही युनिकॉर्नची निर्मिती झाली नाही. मे महिन्यात फारच कमी गुंतवणूक झाली. 


आतापर्यंत 27 भारतीय स्टार्टअप्सने 10,029 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. यामध्ये कार्स 24, मीशो, ओला, एमपीएल, ट्रेल, वेदांतु आदी युनिकॉर्नचा समावेश आहे. मे महिन्यात 9 स्टार्टअपद्वारे नोकर कपातीची नोटीस देण्यात आली होती. मे महिन्यात 3379 कर्मचाऱ्यांचे रोजगार हिरावला. जून महिन्यात आतापर्यंत 10 स्टार्टअप्सने कर्मचारी कपात केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: