Foreign Currency : भारताच्या परकिय गंगाजळीत पुन्हा एकदा घट झाली आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात परकीय गंगाजळीत घट झाली आहे. याआधी फक्त दोन आठवडेच परकीय गंगाजळीत वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्याआधीच्या 10 आठवड्यात यामध्ये घट झाल्याचे नोंदवण्यात आले होते. 


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार,  मागील 17 जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय गंगाजळीत 5.87 अब्ज डॉलरची घट झाली. त्यानंतर भारताची परकीय गंगाजळ 590.58 अब्ज डॉलर इतकीच राहिली आहे. या आधी मागील आठवड्यात  (10 जून 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात) भारताच्या परकीय गंगाजळीत  4.59 अब्ज डॉलरची घट झाली होती. त्या आठवड्यात परकीय गंगाजळ  596.45 अब्ज डॉलर इतकीच राहिली. सलग तिसऱ्या आठवड्यात भारताची परकीय गंगाजळ घटली असल्याचे दिसून आले. 


20 मे आधीदेखील सलग 10 आठवडे झाली होती घट


भारताची परकीय गंगाजळ एक महिन्यांहून अधिक काळ 600 अब्ज डॉलरपेक्षा कमी होती. त्यानंतर सलग 10 आठवडे परकीय गंगाजळीत घट झाली होती. त्यानंतर 20 मे 2022 आणि 27 मे 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय गंगाजळीत वाढ झाली होती. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 27 मे रोजीच्या आठवड्यात देशातील परकीय गंगाजळ 3.85  अब्ज डॉलरने वाढून 601.36 अब्ज डॉलर इतका झाला. 


10 जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा कमी होण्यामध्ये परकीय चलन संपत्ती किंवा विदेशी चलन मालमत्तांमध्ये झालेली घसरण महत्त्वाचे कारण असल्याचे म्हटले जात आहे. एकूण परकीय चलनाच्या साठ्यापैकी हा एक महत्त्वाचा घटक आहे. विदेशी चलनात युरो, पौंड आणि येन यांसारख्या डॉलरशिवायच्या चलनांचाही समावेश आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: