Jet Airways Latest Update : तीन वर्षांनंतर जेट एअरवेज (Jet Airways) पुन्हा एकदा सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीनं दिवाळखोरीमुळे 2019 साली सेवा बंद केली होती. त्यानंतर आता तीन वर्षानंतर जेट एअरवेज उड्डाण घेण्यासाठी सज्ज झालं आहे. कंपनीनं जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्यास सांगितलं आहे. शिवाय कंपनीनं भरतीही सुरु केली आहे. कंपनीनं केबिन क्रूच्या जुन्या कर्मचाऱ्यांना परत कामावर बोलावलं आहे.
लवकरच सुरु होईल सेवा
जुलै-सप्टेंबर या तिमाहीत विमान कंपनीची उड्डाण सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीने केवळ महिला क्रू मेंबर्सला परत बोलावलं आहे. शुक्रवारी ट्विटरवर पोस्ट शेअर करताना एअरलाइन्सनं म्हटलं आहे की, घरासारखे काहीही नाही. जेट एअरवेजच्या जुन्या केबिन क्रूला परत येण्यासाठी आणि भारतातील सर्वोत्तम एअरलाइन पुन्हा सुरू करण्यासाठी एकत्र येण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. सध्या आम्ही फक्त महिला क्रूला आमंत्रित करत आहोत. पुरुष क्रूची भरती झाल्यानंतर आम्ही उड्डाण सेवा सुरू करण्यात येईल.
कर्जामुळे तीन वर्ष बंद होती सेवा
वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला पुन्हा सुरु करण्यासाठी मागील बराच काळापासून प्रयत्न सुरु होते. कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर हवाई वाहतूक संचालनालयाकडून सर्व परवानग्या घेऊन आता कंपनी लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु होणार आहे.
डीजीसीएकडून सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी
हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने (DGCA) 20 मे रोजी परवानगी दिल्यानंतर आता जेट एअरवेजची सेवा पुन्हा सुरु होणार आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे मागील तीन वर्षे बंद असणारी जेट एअरवेज (Jet Airways Airline) कंपनीची विमानं आता पुन्हा उड्डाण घेणार आहेत. हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने (DGCA) परवानगी दिल्याने आता ही विमानसेवा पुन्हा सुरु होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या