ऑटो-पायलट फीचर वाल्या AI कारची Shark Tank एन्ट्री; BoAt CEO म्हणाला, "तेरे बस की बात नही, कही और नोकरी कर ले"
Shark Tank India: शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सीझनमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उत्पादनं पाहायला मिळत आहेत. शोच्या नव्या भागात, एका पिचरनं हायड्रोजनवर चालणारी AI कार सादर केली.
Shark Tank India 3rd Session: मुंबई : शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) तिसऱ्या सीझनचा लेटेस्ट एपिसोड लाईव्ह झाला आहे. याची सुरुवात Pizzeria ब्रँडच्या पिचपासून झाली. दरम्यान, शार्क Pizzeria च्या काम आणि प्रॉफिटच्या पद्धतीनं फारसे खूश झाले नाहीत. त्यानंतर मात्र शार्कसमोर आली AI फिचर्स असलेली भारताची पहिली वहिली हायड्रोडन कार.
हर्षल महादेव आपल्या AI फिचर्स असलेल्या कारचा प्रोटोटाईप घेऊन आले होते. त्यांनी स्वतःला भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजेंस हाइड्रोजन बेस्ड वेइकल मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअपचं (Indias first Artificial Intelligence Hydrogen Based Vehicle Manufacturing Startup) फाउंडर असल्याचं सांगितलं. हर्षलनं आपली कार केवळ 18 महिन्यांमध्ये घराच्या मागे असलेल्या गॅरेजमध्ये तयार केलं होतं.
शार्क्सनी कितीची दिली ऑफर?
हर्षल महादेव यांनी आपल्या कंपनीच्या 4 पर्सेंट इक्विटीसाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. हर्षलच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस हाइड्रोजन बेस्ड कारची शार्क्सनी टेस्ट ड्राईव्हही घेतली. त्यासोबतच अनुपम, विनीता आणि नमिता हर्षल यांच्यासोबत कारमध्ये सवार होतात आणि ड्राईव्ह सुरू होते. सर्व शार्क कारच्या इनोवेशननं खूपच खूश होते.
त्यानंतर हर्षलनं आर्टिफिशियल इंटेलिजेंस हाइड्रोजन बेस्ड कार कशी तयार केली? ही कल्पना कशी आली? या आपल्या प्रवासाबाबत शार्क्सना सांगितलं. दरम्यान, शार्क्सना कारचं मार्केट तसं फारसं समजलं नाही, कारण या टेक्नॉलॉजीसह अनेक नामांकीत ब्रँड्स मार्केटमध्ये आधीच पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. काही शार्क्सनी हर्षलला AI आणि हायड्रोजन कार दोन्ही गोष्टींवर वेगवेगळं लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
शार्क अमननं काय म्हटलं?
हर्षलच्या कारनं सर्व शार्क्सना भूरळ घातली. पण, असं असलं तरीही त्याला कोणत्याही शार्ककडून फारशी गुंतवणूक मिळाली नाही. हर्षलनं तयार केलेल्या कारला तोड नसली तरीदेखील, त्याला मार्केटबाबत मात्र फारशी स्पष्टता नव्हती. त्यामुळेच शार्क्सकडून त्याला गुंतवणूक मिळाली नाही. शार्क अनुपमनं हर्षलला विचारलं की, तू कार असेंबली लाईन कशी तयार करशील आणि तुझ्या कारला ब्रँड आउट कसं कराल?
तर शार्क अमन गुप्तानं हर्षलला सांगितलं की, "तू चांगला माणूस आहेस, पण ब्रँड किंवा बिझनेस उभा करू शकत नाहीस. तू जा आणि कुठेतरी नोकरी मिळव, तुझ्या कौशल्यानं इतर ब्रँड्सना मदत कर. तू यात 8 ते 9 वर्षांची गुंतवणूक केली आहेस,त्यामुळे काहीतरी वेगळं कर, मी यातून बाहेर आहे. मी तुझ्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करू शकत नाही."