एक्स्प्लोर

Share Market Updates : शेअर बाजारात तेजीचे वातावरण; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला

Share Market Update:  शेअर मार्केटमध्ये आज सकाळच्या सत्रात चांगले संकेत दिसून आले. सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला.

Share Market Update:  आज मंगळवारी  शेअर बाजारात चांगली तेजी दिसून येत आहे.  अमेरिकन बाजारातील संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले असून शेअर खरेदीचे संकेत मिळत आहेत. 

आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीने झाली. निफ्टी एक टक्क्यांनी वधारत 17,121 अंकावर सुरू झाला. सेन्सेक्समधील 30 शेअरचा निर्देशांक 485.35 अंकानी वधारत 57,066.24 अंकावर सुरू झाला. 

निफ्टीतील 50 पैकी 49 शेअर्सचे दर वधारले आहेत. हिंदाल्कोचा शेअर दर 0.55 टक्क्यांनी घसरला आहे. तर, बँक निफ्टीमध्ये 474 अंकानी उसळण घेतली आहे.  बँक निफ्टी 36,557  या अंकावर व्यवहार करत आहे. 

ऑटो क्षेत्रातील शेअर्स वधारले 

आज ऑटो क्षेत्रातील शेअर्स चांगलेच वधारले आहेत. ऑटो निर्देशांक दोन महिन्यातील उच्चांकावर व्यवहार करत आहेत. बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये 2.85 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. बँकिंग शेअर्समध्ये आयसीआयसीआयमध्येदेखील तेजी दिसत आहे. टाटा मोटर्समध्ये 2.38 टक्के, हिरो मोटोकॉर्पमध्ये 2.35 टक्क्यांची उसळण दिसून आली आहे. 

सोमवारी शेअर बाजाराची काय स्थिती होती?

सोमवारी शेअर बाजारात दिवसभर विक्रीचा सपाटा दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. जागतिक शेअर बाजारात असलेल्या घसरणीच्या संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असताना दुसरीकडे बँकिंग क्षेत्रात खरेदीचा ट्रेंड दिसून आला. 

सोमवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 617.26  अंकानी घसरला. जवळपास 1.08 टक्क्यांची घसरण होऊन सेन्सेक्स 56,579.89 अंकावर बंद झाला. त्याशिवाय, निफ्टी इंडेक्स 218 अंक म्हणजे 1.27 टक्क्यांनी घसरला. निफ्टी 16,953.95 अंकावर बंद झाला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Highest Dividend : कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला

Embed widget