(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : सेन्सेक्स, निफ्टीची घोडदौड, सेन्सेक्स 60 हजारांच्या पार, निफ्टी 18 हजारांवर, आयटी कंपन्यांना 'अच्छे दिन'
Share Market Updates : शेअर मार्केटने पुन्हा एकदा उसळी घेतली असून सेन्सेक्स 60 हजारांच्या पलिकडे गेला आहे तर निफ्टी 18 हजारांवर पोहोचला आहे.
Share Market Updates : शेअर मार्केटच्या आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली आहे. शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी आली असून सेन्सेक्स (Sensex) 60 हजारांचा आकडा पार केला आहे. तर, निफ्टीही (Nifty) 18 हजारांवर पोहोचला आहे. सोमवारी मार्केट बंद होताना सेन्सेक्समध्ये एकूण 1.09 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,395.63 अंकावर बंद झाला. तर निफ्टीमध्येही 1.07 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,003.30 वर पोहोचला होता. तर आज बाजारात उघडताच सेन्सेक्सने 0.24 टक्क्यांनी उसळी घेत 60,541 वर पोहोचला. त्याशिवाय निफ्टी 0.17 टक्क्यांनी वधारून 18,037 वर पोहोचला आहे.
मंगळवारी शेअर बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. सोमवारीही बँका आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. सोमवारी दिवसभरात एकूण 2472 शेअर्सच्या किंमती कमी अधिक प्रमाणात वधारल्या होत्या. तर 948 शेअर्सच्या किंमती कमी अधिक प्रमाणात घसरल्या. तर 88 शेअर्सच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.
सोमवारी शेअर मार्केट बंद होताना UPL, Hero MotoCorp, Titan Company, Tata Motors आणि Maruti Suzuki च्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Wipro, Nestle, Divis Labs, Asian Paints आणि Power Grid Corp च्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
गेले काही दिवस कोरोनाचा वाढता संसर्ग आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. मात्र, मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 ने सुरुवात सकारात्मक नोंदीवली. आर्थिक, तेल आणि वायू आणि आयटी शेअर्समधील नफ्याने हेडलाईन निर्देशांक उंचावले, तरीही मेटल स्क्रिप्समधील तोटा आढळून आला. सत्राच्या सुरुवातीला निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक सुरुवातीच्या सौद्यांमध्ये 0.2 टक्क्यांनी वाढला.
महत्त्वाच्या बातम्या :
- North Korea : किम जोंग उनचा हेतू काय? उत्तर कोरियाकडून आठवड्याभरात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी
- Trending News : बर्फाळलेल्या काश्मीरमध्ये भारतीय जवानांचा 'खुकुरी डान्स', व्हिडीओ व्हायरल
- Upcoming Movies and Web Series : 'मिर्झापूर सीझन 3' पासून 'गेहरियां'पर्यंत यावर्षी प्राइम व्हिडिओवर मनोरंजनाचा संपूर्ण डोस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha