Share Market Updates : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्स 500 अंकानी वधारला
Share Market : मागील काही दिवसांपासून पडझड झाल्यानंतर शेअर बाजारात आज तेजी दिसून आली.
Share Market : जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली आहे. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 202.34 अंकानी वधारला. आज सेन्सेक्स 52,995.96 अंकावर सुरू झाला. निफ्टी निर्देशांकात 62 अंकानी वाढ झाली. मागील काही दिवस सुरू असलेल्या पडझडीनंतर आज शेअर बाजारात तेजी दिसत आहे.
आशियाई शेअर बाजारात आज चांगली सुरुवात झाली. निक्केईमध्ये तेजी दिसत आहे. तर, शांघाई आणि कोस्पीमध्ये विक्रीचा दबाव आहे. त्याशिवाय, अमेरिकन शेअर बाजारही 150 अंकांनी वधारला आहे. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार वधारत बंद झाला होता.
सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 615 अंकानी वधारला असून 53,408.66 अंकावर व्यवहार करत होता.तर, निफ्टी 185 अंकानी वधारला असून 15,967.30 अंकावर व्यहार करत आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसत आहे. तर 7 शेअर्समध्ये विक्री सुरू आहे. टाटा स्टीलमध्ये चांगली मागणी आहे.
टाटा स्टीलशिवाय, टायटन, मारूती, बजाज फायनान्स, एल अॅण्ड टी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एसबीआय, इंडसइंड बँक, रिलायन्स, विप्रो, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, एनटीपीसी, टीसीएस, सन फार्मा, आयटीसी आदींमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे.
आज शेअर बाजारात एफएमसीजी, फार्मा, हेल्थकेअर क्षेत्रात जोरदार विक्री होत आहे. निफ्टी बँक, ऑटो, आयटी, मीडिया, मेटल, सार्वजनिक बँका, वित्तीय सेवा आदी क्षेत्रात तेजी दिसत आहे.
दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजारात पडझड झाली होती. शेअर बाजारातील व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 136 अंकानी घसरला होता. तर, निफ्टीदेखील 25 अंकानी घसरला होता.बाजार बंद होताना बँक, मेटल आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक तो दोन टक्क्यांची घसरण झाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- FD Interest Rate : मुदत ठेवींवर हवा चांगला व्याज दर? या स्मॉल फायनान्स बँकांचा आहे पर्याय
- RBI: महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर RBI कडून कारवाई, ग्राहाकांना पैसे काढण्यास मनाई