एक्स्प्लोर

Share Market Updates : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण

Share Market Updates : शेअर बाजारात आज विक्रीच्या सपाट्याने घसरण सुरू आहे.

Share Market Updates : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला विक्रीचा सपाटा आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण याचा परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे. बँकिंग,  आयटी, मेटल्सच्या शेअरमध्ये जोरदार घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास एक टक्क्यांच्या घसरणीसह सुरू झाले. 

आज शेअर बाजारात सेन्सेक्स 554.30 अंकाच्या घसरणीसह 52,623.15 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा 50 शेअरचा निफ्टी निर्देशांक 148.50 अंकांच्या घसरणीसह 15,701 अंकांवर खुला झाला होता. सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स  293 अंकांच्या घसरणीसह 52,885.71 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 92 अंकांच्या घसरणीसह 15,757.50 अंकांवर व्यवहार करत होते. 

निफ्टी 50 मधील सर्व 50 शेअर्समध्ये आज घसरण झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात चौफेर विक्री सुरू असल्याने शेअर दरात घसरण झाली आहे. निफ्टीत सुरुवातीला 15687 च्या व्यवहार पातळीवर घसरला होता. तर, बँक निफ्टीमध्ये 40.3.20 अंकांची घसरण झाल्याचे दिसून आले.  बँक निफ्टी 1.20 अंकांच्या घसरणीसह  33,239 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. 

इंडसंइंड बँकेच्या शेअर दरात 2.5 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. एचयूएल 2.46 टक्क्यांची घसरण झाली आहे. हिंदाल्कोमध्ये 20.5 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 1.94 टक्के आणि विप्रोमध्ये 1.93 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. 

दरम्यान, मंगळवारी शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये अवघ्या 16 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टी 18 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 53,177 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.11 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,850 अंकांवर पोहोचला. मंगळवापरी 1737 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1460 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 139 कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

रिलायन्स जिओची धुरा आता आकाश अंबानींच्या हाती, मुकेश अंबानींचा संचालकपदाचा राजीनामा

 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
JIO IPO : रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, जिओच्या IPO च्या पत्रकार परिषदेत आकाश अंबानी यांनी मिशन मांडलं
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Embed widget