शुक्रवारी 'या' 10 पेनी स्टॉक्सचा राहणार बोलबाला? गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल!
सध्या शेअर बाजारात अनेक चढउतार पाहायला मिळतायत. गुरुवारी काही पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. त्यामुळे हे स्टॉक शुक्रवारीदेखील चांगला परतावा देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
![शुक्रवारी 'या' 10 पेनी स्टॉक्सचा राहणार बोलबाला? गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल! share market update today this ten penny stocks may give good returns to investors शुक्रवारी 'या' 10 पेनी स्टॉक्सचा राहणार बोलबाला? गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/31/eaeb5e29375d4a378b15c49fc5efef7b1717121592383988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल आणि एक्झिट पोलचा (Exit Polls) अंदाज यामुळे शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता आहे. गुरुवारी संपूर्ण सत्रादरम्यान निर्देशांकात मोठे चढउतार पाहायला मिळाले. गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 216 अंकांनी घसरून 22488 अंकांवर बंद झाला. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 617 अंकांनी घसरून 73 885 अंकांवर स्थिरावला. गुरुवारी सत्रादरम्यान मुंबई शेअर बाजारा 800 अंकांपर्यंत घसरला होता.
दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्ही पैसे कमवू इच्छित असाल तर पेनी स्टॉक्सकडेही तुम्ही लक्ष द्यायला हवं. योग्य अभ्यास करून पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळवता येऊ शकतो. खालील दहा पेनी स्टॉक्सने गुरुवारी चांगली कामगिरी केली होती. या शेअर्सना अपर सर्किट लागले होते. त्यामुळे हे शेअर्स आजदेखील चांगली कामगिरी करू शकतात, असा अंदाज लावला जात आहे.
या दहा पेनी स्टॉक्सवर ठेवा नजर
Ramgopal Polytex Ltd या कंपनीचा शेअर गुरुवारी 5.28 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरमध्ये 10 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Econo Trade (India) Ltd या कंपनीचा शेअर गुरुवारी 7.53 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरमध्ये 9.93 तेजी नोंदवली गेली.
Rgf Capital Markets Ltd या कंपनीचा शेअर गुरुवारी 0.69 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये 9.52 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Wagend Infra Venture Ltd या कंपनीचा शेअर गुरुवारी 2.1 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये गुरुवारी 5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Creative Eye Ltd हा शेअर गुरुवारी 6.93 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरने गुरुवारी गुंतवणूकदारांना 5 टक्क्यांनी रिटर्न्स दिले.
Flora Corporation Ltd कंपनीचा शेअर गुरुवारी 8.19 रुपयांवर पोहोचला होता. या कंपनीने गुंतवणूकदारांना गुरुवारी 5 टक्क्यांनी रिटर्न्स दिले.
RSC International Ltd हा शेअर गुरुवारी 9.66 रुपये झाला. या शेअरमध्ये पाच टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Future Market Networks Ltd हा शेअर गुरुवारी 7.16 रुपयांवर पोहोचला. या शेअरने गुरुवारी 4.99 टक्क्यांनी परतावा दिला.
iStreet Network Ltd हा शेअर गुरुवारी 4.24 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये 4.95 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Fone4 Communications(India) Ltd या कंपनीचा शेअर गुरुवारी 5.09 रुपयांवर पोहोचला. गुरुवारी या शेअरने गुंतवणूकदारांना 4.95 टक्क्यांनी रिटर्न्स दिले.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मॉडलिंग, अभिनय ते 'डीजे वाले बाबू'ची हिरोईन; हार्दिक पांड्याची पत्नी नताशा किती कोटींची मालकीण?
एसी तयार करणारी 'ही' कंपनी जोमात, फक्त पाच दिवसांत दिले 47 टक्के रिटर्न्स!
आरोग्य विमा धारकांना मोठा दिलासा, IRDAI च्या 'या' नव्या निर्णयामुळे आता 3 तासांत क्लेम सेटलमेन्ट!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)