Stock to Watch : सेन्सेक्स निफ्टीमध्ये पुन्हा तेजी सुरु, मंगळवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Share Market Update : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी काही स्टॉक्स चर्चेत राहू शकतात. पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्याचा परिणाम स्टॉक्सवर होऊ शकतो.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळाली. आज बीएसई सेन्सेक्स 443 अंकांनी वाढून 82200.34 अंकांवर पोहोचला. तर, निफ्टी 50 निर्देशांक देखील 122.30 अंकांनी वाढून 25090.70 अंकांवर बंद झाला. आता 22 जुलै रोजी 5 कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकते. तिमाहीचे निकाल, कंपन्यांच्या मोठ्या ऑर्डर, रेटिंग एजन्सींच्य अंदाजानुसार ज्वेलरी, इन्फ्रा आणि कंझ्युमर सेगमेंटच्या कंपन्यांचा समावशे आहे.
टाटा ग्रुपच्या टायटनची सहायक कंपनी टायटन होल्डिंग्ज इंटरनॅशनल एफझेडसीओने Damas LLC मध्ये 67 टक्के भागीदारी खरेदी करण्याचा समझोता केला. Damas LLC आखाती देशातील Damas ज्वेलरी बिझनेसचे मालक आहेत. यामुळं मध्य पूर्वेत व्यवसाय वाढवण्यास टायटनला संधी मिळेल.
अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला क्रोएशियामध्ये एका मेगा रेल्वे प्रोजेक्टला 6800 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. हे कॉन्ट्रॅक्ट क्रोएशियाच्या रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर द्वारे जारी करण्यात आलं आहे. यानुसार Dugo Selo ते Novaska या दरम्यान 83 किलोमीटर लांबीच्या रेल्वे लाइनच्या पुनर्निर्माणाचं आणि आधुनिकीकरणाचं काम केलं जाईल. कंपनीच्या स्टॉकमध्ये 0.40 टक्के वाढ होऊन 418.80 रुपयांवर बंद झाला.
स्मॉल कॅप कंपनी BL Kashyap and Sons Ltd ला BPTP Group कडून 910 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं आहे. हे काम नवी दिल्लीतील एका प्रकल्पाचं आहे. आज हा स्टॉक 72.20 रुपयांवर बंद झाला.
डीसीएम श्रीराम लिमिटेडनं पहिल्या तिमाहीत 13 टक्क्यांची वाढ होऊन निव्वळ नफा 113 कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या वर्षी कंपनीचा नफा 100 कोटी होता. या कंपनीचा स्टॉक सोमवारी 1.86 टक्क्यांनी घसरुन 1382 कोटी रुपयांवर आला आहे.
हैवेल्स इंडिया कंपनीचा पहिल्या तिमाहीतील नफा 14.4 टक्क्यांनी घसरुन 352 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीचं पहिल्या तिमाहीतील उत्पन्न 5438 कोटी रुपये झालं आहे. आज हा स्टॉक 1533.00 रुपयांवर बंद झाला.
स्टेट बँक ऑफ इंडियाचं रेटिंग मूडीजनं बदललं आहे. एसबीआयचं बेसलाइन क्रेडिट असेसमेंट रेटिंग 'ba1' वरुन 'baa3' केलं आहे. याचा अर्थ बँकेच्या अंतर्गत वित्तीय स्थितीला मीडियम ग्रेड कॅटेगरीत मानलं जात आहे. या अपग्रेडमुळं स्टेट बँक ऑफ इंडिया मजबूत भांडवल स्थिती आणि भविष्यातील भांडवल वाढवण्याच्या योजनांना लक्षात घेऊ करण्यात आलं आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)






















