एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदी जोर, सेन्सेक्स 400 अंकानी वधारला

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले आहेत.

Share Market Opening Bell: सोमवारी झालेल्या जोरदार विक्रीनंतर आज बाजारात (Share Market) खरेदीचा जोर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात तेजीने झाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) 300 अंकांनी तर, निफ्टी (Nifty) 100 अंकांनी वधारला. प्री-ओपनिंग सत्रात बाजारात तेजी राहणार असल्याचे संकेत दिसून आले.

आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287 अंकांनी वधारत 58259 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 101 अंकांनी वधारत 17414 च्या पातळीवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 505 अंकांनी वधारला असून 58,478.03 अंकांवर व्यवहार करत आहे. तर, निफ्टीत 165 अंकांची तेजी दिसत असून 17,478.35 अंकांवर व्यवहार करत आहे.

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 29 शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. भारती एअरटेलच्या शेअर दरात घसरण झाली आहे. तर, निफ्टी 50 पैकी 49 शेअर्सचे दर वाढले आहेत. 

बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी आणि एनटीपीसीसह अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, टेक महिंद्रा, पॉवरग्रीडच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.  

सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या निर्देशांकात 1.80 टक्क्यांनी वाढ झाली. तर, मेटलमध्ये 1.54 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. ऑटो निर्देशांक 1.43 टक्क्यांनी वधारला. 

SGX Nifty हा 17452 च्या पातळीवर व्यवहार करत असून यामध्ये 71.50 अंकांची तेजी दिसून येत आली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही तेजी राहणार असल्याचे संकेत दिसून येत होते.

शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'

सोमवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स निर्देशांक 1200 हून अधिक अंकांनी घसरला होता. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरला. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 861 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये 246 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 57,972 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 17,312 अंकांवर स्थिरावला.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर
2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 2 हजारांनी, तर चांदी 10 हजारांनी स्वस्त, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 2 हजारांनी, तर चांदी 10 हजारांनी स्वस्त, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर
गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर,
Aamir Khan Emotional On Stage: 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Prithviraj Chavan and Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा, म्हणाले...
मनोज जरांगे पाटलांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा, म्हणाले...
Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ, आवाजाच्या नमुन्यासाठी घुग्गुस पोलिसांनी नोटीस धाडली, नेमकं प्रकरण काय?
बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ, आवाजाच्या नमुन्यासाठी घुग्गुस पोलिसांनी नोटीस धाडली, नेमकं प्रकरण काय?
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
Yusuf Pathan: गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
Embed widget