एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा दबाव; सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात घसरण

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स, निफ्टीत घसरण झाली आहे.

Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीने झाली. नफावसुलीमुळे विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकात घसरण झाली आहे. गुरुवारी उच्चांक गाठणाऱ्या बँक निफ्टीत आज घसरण दिसून आली आहे. त्याशिवाय, स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही घसरण विक्रीचा दबाव दिसून येत आहे. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स  348.29  अंकांच्या घसरणीसह 59,585.72 अंकांवर खुला झाला आहे. तर निफ्टी निर्देशांक 80.602  अंकांच्या घसरणीसह 17,796.80 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 344 अंकांच्या घसरणीसह 59,589.23 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 95 अंकांच्या घसरणीसह 17,781.45 अंकांवर व्यवहार करत होता. 

प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण दिसून आली. बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 239 अंकांची घसरण दिसली. तर, निफ्टी 148 अंकांच्या घसरणीसह 17729 अंकावर व्यवहार करत होता.  

सेन्सेक्समधील 30 पैकी 8 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 22 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर, निफ्टीतील 50 पैकी 14 शेअर्समध्ये खरेदी दिसत असून 35 शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसत आहे. 

इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा, टायटन, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्हसह टाटा स्टील आणि आयटीसी, एसबीआय आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 

मारुती, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, एचयूएल, डॉ. रेड्डीज लॅब, एनटीपीसी, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड, भारती एअरटेल, एल अॅण्ड टी, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, इन्फोसिस बँक, एचडीएफसी, विप्रो, टीसीएस आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 

वेदांताच्या शेअर्समध्ये घसरण

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्पच्या घोषणेनंतर वेदांताचे शेअर दर काही प्रमाणात वधारले होते. त्यानंतर  वेदांताची होल्डिंग कंपनी असलेल्या व्होल्कन इन्व्हेस्टमेंट्सचा हा प्रकल्प भाग असणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. त्याच्या परिणामी आज वेदांताच्या शेअर दरात 6 टक्के घसरण दिसून आली. 

गुरुवारी घसरण 

गुरुवारी सकाळी बाजारात दिसून आलेला खरेदीचा जोर ओसरला आणि बाजारात विक्रीचा दबाव वाढला. जागतिक शेअर बाजारातील संकेत आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफावसुली याच्या परिणामी शेअर बाजारात घसरण दिसून आली. बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 59,934 अंकांवर तर निफ्टी  17,877 अंकांवर स्थिरावला. 

महत्त्वाच्या बातम्या

Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget