मुंबई : सध्या बँकिंग किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात केवायसीला फार महत्त्व आले आहे. शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड, कमोडिटी मार्केट यामध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर येथेदेखील आता केवायसीसंदर्भात नियम कडक झाले आहेत. दरम्यान, केवायसी पूर्ण नसल्यामुळे साधारण 1.3 कोटी डीमॅट अकाउंट होल्डवर ठेवण्यात आले आहेत. याचाच अर्थ असा की केवायसी नसल्यामुळे तब्बल 1.3 कोटी लोकांना कोणतेही ट्रान्झिशन करता येणार नाही. त्याना शेअर बाजाार, म्यूच्यूअल फँड, कमोडिटी मार्केट यात व्यवहार करता येणार नाहीत. 


1.3 कोटी खाते होल्डवर


केआरए संस्थेच्या माहितीनुसार 11 करोड़ गुंतवणूकदारांपैकी साधारण 1.3 कोटी लोकांचे खाते होल्डवर ठेवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार साधारण 1.3 कोटी खाते हे सेबीच्या नियमानुसार नाहीत. याबाबत केआरए या कंपनीने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार ज्या खातेधारकांनी योग्य पद्धतीने त्यांची केवायसी करून घेतलेली नाही, त्यांना शेयर, कमोडिटी आणि म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. केवायसी पूर्ण नसलेल्या अनेक लोकांचे आधारकार्ड हे पॅनकार्डशी लिंक नाही. तसेच अनेकांच्या पॅन आणि आधारकार्डवर योग्य माहिती देण्यात आलेली नाही. याआधी केवायसी करताना खातेधारकाकडून वीजबील, टेलिफोन बील, बँकेचे स्टेटमेंट मागवले जायचे. मात्र सेबी ही कागदपत्रे आता ग्राह्य धरत नाही. याच कारणामुळे लोकांना आता केवायसी परत करून घ्यावी लागतेय. 


केवायसीचे तीन प्रकारात वर्गीकरण 


1 एप्रिलपासून केवायसीचे नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत. केवायसी व्हॅलिडेट (Validated), रजिस्टर्ड Registered) आणि होल्ड ऑन (On Hold) अशा तीन वेगवेगळ्या गटांत विभागण्यात आलीआ आहे. खातेधारकाने केवायसी करताना कोणती गादपत्रे सादर केली होती, त्याआधारे हे वर्गीकरण करण्यात आले आहे. ज्या लोकांची केवायसी व्हॅलिडेट आहे अशा


लोकांना वेगळं काहीही करण्याची गरज नाही. ते शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड यांच्यात गुंतवणूक करू शकतात. ज्या गुंतवणूकदारांच्या खात्यांना रजिस्टर्ड केवायसी (Registered KYC) या श्रेणीत टाकण्यात आले आहे, त्यांनादेखील गुंतवणूक करता येईल. मात्र नव्या फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा नवे डीमॅट खाते खोलायचे असेल तर अशा गुंतवणूकदारांना पुन्हा एखदा (Re-KYC) करावी लागेल. ज्या लोकांनी बीजबील, बँक स्टेटमेंट, टेलिफोन बील यांच्या मदतीने याआधी केवायसी केलेली आहे, त्यांचे खाते होल्ड करण्यात आले आहेत. ते कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाहीत. त्यासाठी त्यांना अगोदर केवायसी पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. 


7.9 कोटी लोकांची केवायसी ग्राह्य 


केआरए संस्थेनुसार एकूण 11 कोटी गुंतवणूकदारांपैकी 7.9 कोटी (73%) व्हॅलिड गुंतवणूकदार आहेत. तर 1.6 कोटी गुंतवणूदारांना रजिस्टर्ड श्रेणीत टाकण्यात आले आहे. अशा ग्राहकांना गुंतवणूक करण्यास काही मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. तर एकूण 12 टक्के गुंतवणूकदार असे आहेत, ज्यांना डीमॅट आणि एमएफ फोलिओ ऑपरेट करता येणार नाही. 


केवायी कसे करावे? 


केवायसी करण्यासाठी कोणत्याही केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यावर केवायसी इन्क्वायरी या ऑप्शनवर क्लीक करावे. तेथे तुमच्या खात्याची नेमकी स्थिती काय आहे? हे तपासता येईल. त्यानुसार  तुम्हाला तुमच्या केवायसीसंदर्भात योग्य तो निर्णय घेता येईल. यासह तुम्ही तुमचा ब्रोकर, म्यूच्यूअल फंडच्या संकेतस्थळावर जाऊनही तुमची केवायसी अपडेट करता येऊ शकते. 


हेही वाचा :


'हे' पाच मिडकॅप फंड, ज्यांनी अनेकांना केलं लखपती, तीन वर्षांपूर्वी SIP करणारे आज मालामाल!


पुढचे दहा दिवस 'या' तीन कंपन्यांवर लक्ष ठेवा, गुंतवणूक केल्यास मिळू शकतो चांगला परतावा!


विमा कंपनी क्लेम नाकारत असेल तर काय करावं? 'या' दोन मार्गांनी मिळू शकतो क्लेम!