मुंबई : जोखीम न घेता भांडवली बाजारून पैसे कमवायचे असतील तर एसआयपी हा उत्तम मार्ग आहे. आजकाल एसआयपीच्या (SIP) माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. ज्या लोकांनी दहा वर्षांपूर्वी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली आहे, त्यांनी आज लाखो रुपये कमवले आहेत. दरम्यान, एसआयपीमध्ये इक्विटी श्रेणीतील मिडकॅप फंडांत (Midcap Fund) पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. मिडकॅप फंडांचा गेल्या तीन वर्षांचा अभ्यास केला तर  या फंड्सनी साधारण 42 टक्क्यांची कमाई करून दिलेली आहे, हे स्पष्ट होते. याच पार्श्वभूमीवर जबरदस्त परतावा देणारे काही मीडकॅप फंड जाणून घेऊ या...


Quant Mid Cap Fund


क्वांट मिडकॅप फंडाने गेल्या तीन वर्षांत साधारण 38.58 टक्के एसआयपी रिटर्न दिलेले आहेत.या फंडात ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी प्रतमहिना 10000 रुपयांची गुंतवणूक केलेली असेल त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 6,47,266 रुपये झाले आहे. या फंडात कमीत कमी प्रतिमहिना 1000 रुपयांची गुंतवणूक करून  SIP चालू करता येते.  


Motilal Oswal Midcap Fund


गेल्या तीन वर्षांत मोतीलाल ओस्वाल या मिडकॅप फंडानेही चांगले एसआयपी रिटर्न्स दिलेले आहेत.  हे प्रमाण साधारण 37.41 टक्के राहिलेले आहे. या फंडात ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक केलेली आहे, त्या पैशांचे मूल्य आता 6,21,993 रुपये झालेले आहे. प्रतिमहिना कमीत कमी पाचशे रुपयांची गुंतवणूक करून या फंडाच्या माध्यमातून एसआयपीला सुरुवात करता येते.  


ITI Mid Cap Fund


या आयटीआय मीडकॅप फंडाने गेल्या तीन वर्षांत साधारण 26.66 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. या फंडात तीन वर्षांपूर्वी समजा प्रतिमहिना 10000 रुपयांची गुंतवणूक केलेली आहे, त्यांच्या गुंतवणुकीचे आज 5,95,593 रुपए झाले आहेत. कमीत कमी पाचशे रुपयांची गुंतवणूक करून या फंडात एसआयपी चालू करता येते. 


Mahindra Manulife Mid Cap Fund


हादेखील चांगला परतावा देणारा मिडकॅप फंड आहे. या फंडाने गेल्या तीन वर्षांत साधारण 30.69 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. तुम्ही तीन वर्षांपूर्वी या फंडात प्रतिमहिना 10000 रुपए गुंतवले असते तर त्याचे आज 5,95,789 रुपए झाले असते. या फंडातदेखील कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करून एसआयपीला सुरुवात करता येते. 


HDFC Mid-Cap Opportunities Fund


या फंडाने गेल्या तीन वर्षांत 30.26 रुपये रिटर्न्स दिलेले आहेत. या फंडात तीन वर्षांपासून प्रतिमहिना दहा हजार रुपये गुंतवणारे आज 5,85,236 रुपयांचे मालक झाले आहेत. या फंडात कमीत कमी शंभर रुपयांची गुंतवणूक करून एसआयपीला सुरुवात करू शकता.


(टीप- ही फक्त प्रातिनिधिक माहिती आहे. आम्ही या लेखाच्या उद्देशातून कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


हेही वाचा :


पुढचे दहा दिवस 'या' तीन कंपन्यांवर लक्ष ठेवा, गुंतवणूक केल्यास मिळू शकतो चांगला परतावा!


विमा कंपनी क्लेम नाकारत असेल तर काय करावं? 'या' दोन मार्गांनी मिळू शकतो क्लेम!


आलिशान बंगला, महागडी कार, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आहे कोट्यवधीची मालकीण, एकूण संपत्ती किती?