Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुढचे दहा दिवस 'या' तीन कंपन्यांवर लक्ष ठेवा, गुंतवणूक केल्यास मिळू शकतो चांगला परतावा!
ब्रोकरेज फर्म HDFC Securities ने शॉर्ट टर्म पोझिशनल ट्रेडर्ससाठी काही शेअर निवडले आहेत. हे शेअर आगामी काळात चांगला परतावा देऊ शकतात, असा अंदाज HDFC Securities ने व्यक्त केला आहे. आगामी दहा दिवस नजरेसमोर ठेवून कंपनीने खालील शेअर्स सुचवले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHDFC Securities ने Star Cement चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर खरेदी करताना टार्गेट 252 रुपये तर स्टॉपलॉस 223 रुपये ठेवावा असे या फर्मने म्हटले आहे. 30 एप्रिल रोजी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 237 रुपये होते.
एचडीएफसी सेक्युरिटीजने Dilip Buildcon या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 498 रुपयांचे टार्गेट आणि 447 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा, असे फर्मने म्हटले आहे. 30 एप्रिल रोजी या कंपनीचा शेअर 469 रुपये होता.
HDFC सेक्युरिटिजने Campus Activewear या कंपनीचा शेअर बाय करता येईल, असे सांगितले आहे. त्यासाठी कंपनीने 294 रुपयांचे टार्गेट तर 234 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 30 एप्रिल 2024 या शेअरचा भाव 250 रुपये होता.
(टीप- हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. आम्ही कोणताही शेअर खरेदी किंवा विकण्याचा सल्ला देत नाही. प्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल, तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)