एक्स्प्लोर

Share Market Crash: शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे', सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला

Share Market fallen : सोमवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. या विक्रीमुळे सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला.

Sensex down 1200 points : शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी आजचा दिवस निराशाजनक असल्याचे चित्र आहे. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला. निफ्टीतही घसरण दिसून आली. जागतिक बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला. ही घसरण दुपारच्या सत्रातही कायम राहिली.

अमेरिकेत मध्यवर्ती बँकेकडून व्याज दर वाढवण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात मोठा दबाव निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या परिणामी शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांकडून सपाट्याने विक्री सुरू आहे. 

निफ्टी 50 मधील 45 स्टॉकमध्ये शेअर्स विक्रीचा सपाटा सुरू होता. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 28 स्टॉकमध्ये विक्रीमुळे घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीतील 12 पैकी 10 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये सुरू असलेल्या घसरणीमुळे वर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स निर्देशांक 58 हजाराखाली आला आहे. दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1271 अंकांच्या घसरणीसह 57,771 अंकावर व्यवहार करत होता. 

सोमवारी प्री-ओपन सत्रापासूनच शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 250 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये 0.44 टक्क्यांनी घसरण होत 17,550 अंकांवर बाजार सुरू झाला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 517.42 अंकांनी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 58,499 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 193 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 17,422 अंकावर व्यवहार करत होता. 

अमेरिकेतील धोरणाचा परिणाम 

अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात फेडरल बँकेची महत्त्वाची बैठक होणार आहे. बुधवारी समारोप होणाऱ्या या बैठकीत व्याज दर वाढवण्यात येण्याचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणुकदारांकडून शेअर बाजारात विक्री करण्यात येत आहे. भारतीय शेअर बाजारात हाच कल दिसून येत आहे. शुक्रवारी परदेशी गुंतवणुकदारांनी 3148.58 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Embed widget