एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : शेअर बाजारात खरेदीचा जोर; 1500 अंकाच्या उसळणीसह सेन्सेक्स वधारला

Share Market Closing Bell : आज शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसल्याने सेन्सेक्स 1500 अंकानी वधारला.

Share Market Closing Bell : गुरुवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर  खरेदी दिसून आली. जागतिक शेअर बाजारात मिळालेले सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार वधारून बंद झाला. सेन्सेक्समध्ये 1500 अंकाची उसळण दिसून आली. तर, निफ्टी 16000 अंकावर व्यवहार करत होता. 
 
बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1546 अंकाची उसळण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशाक 54,343 अंकावर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 462 अंकानी उसळला. निफ्टी 16274 अंकावर बंद झाला. चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्याज दर घटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. त्याशिवाय अनेक चांगल्या स्टॉक्समध्ये घसरण झाल्याने कमी किंमतीत शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणुकदारांनी भर दिला. 

शेअर बाजारातील आजच्या तेजी सर्वच क्षेत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बँक निफ्टीमध्ये 2.89 टक्के म्हणजे 962 अंकानी वधारला. बँक निफ्टी आज 34277 अंकावर बंद झाला. त्याशिवाय, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, मीडिया या क्षेत्रातील शेअर वधारले. निफ्टीमधील  50 पैकी 48 शेअर तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 30 शेअर्स वधारले होते. 

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्लू स्टील, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स या स्टॉक्समध्ये चांगली खरेदी झाली. 

आज बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 665.12 अंकानी वधारला. निफ्टीने सुरुवातीलाच 16000 अंकाचा टप्पा ओलांडला. आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला होता. जवळपास सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली. गुरुवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1416 अंकांनी, तर निफ्टी 430 अंकानी घसरला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
Embed widget