एक्स्प्लोर

Share Market :  शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळला, निफ्टी 23700 च्या खाली, बाजारात घसरण 'या' कारणांमुळं

Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.  

Share Market Crash नवी दिल्ली: भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. सोमवारी शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटींचे नुकसान झाले होते. आज देखील भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळं क्रूड ऑईलचे दर वाढले. यामुळं भारतीय शेअर बाजाराला फटका बसला आहे. सेन्सेक्स 464 अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 23700 च्या खाली आला आहे. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये घसरण झालीय. इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 464.33 अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 23675.15 वर आला होता.  

Share Market Crash:शेअर बाजारातील घसरणीची कारणं

कच्चा तेलाच्या दरात वाढ

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्यानं कच्चा तेलाचे दर वाढले आहेत. यामुळं शेअर बाजाराला फटका बसतोय. ब्रेंट क्रूडच्या दरात 1 टक्के वाढ होऊन ते 98 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. नव्यानं हल्ला झाल्यास अमेरिकेशी संबंधित ऊर्जा केंद्रांवर हल्ले करु अशी धमकी इराणकडून देण्यात आली आहे. यामुळं पश्चिम आशियात तणाव वाढला आहे.
 
खासगी बँका आणि ऑटो सेक्टरमुळं बाजारावर दबाव

शेअर बाजारात आज खासगी बँका आणि ऑटो सेक्टरमधील शेअरमधील घसरणीमुळं दबाव वाढला. निफ्टी प्रायवेट बँक आणि निफ्टी ऑटोमध्ये घसरण झाली आहे.

India VIX मध्ये वाढ

बाजारातील जोखीम मोजणाऱ्या वोलॅटिलिटी इंडेक्स इंडिया विक्समध्ये वाढ झाल्यानं मार्केटवर दबाव वाढला आहे. सध्या VIX निर्देशांक 0.60 टक्क्यांची वाढ होऊन 11.23 वर पोहोचला आहे.यामध्ये वाढ झाल्यानं शॉर्ट टर्ममध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.  

टेक्निकल कारणं 

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार बाजारात पुन्हा बुलिश मोमेंटम मिळवण्यासाठी निफ्टीनं 23800 लेव्हल पार करावी लागेल. चॉइस ब्रोकिंग प्रायवेट लिमिटेडच्या टेक्निकल रिसर्च विश्लेषक हितेश टेलर यांच्या मते 23,650-23,700 चा तात्काळ सपोर्ट दिसतोय. हितेश टेलर यांच्या मते सपोर्ट झोन दिसून येतोय. निफ्टी पुन्हा मजबूत करु शकतो. निफ्टी 23650 पेक्षा खाली गेल्यास आणखी घसरण येऊ शकते.  

निफ्टीमध्ये गेल्या महिन्यात 1000 अंकांची घसरण 

शेअर बाजारातील घसरणीमुळं निफ्टी 50 मध्ये गेल्या महिन्यात 1000 अंकांची घसरण झाली आहे. 24775 अंकांवरुन निफ्टी 50  निर्देशांक 23775 अंकांपर्यंत खाली आला आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

How To Create Will : मृत्यूपत्र कसे तयार करायचे? किती खर्च येतो? जाणून घ्या 
How To Create Will : मृत्यूपत्र कसे तयार करायचे? किती खर्च येतो? जाणून घ्या 
1 November Rules Change : 1 नोव्हेंबरपासून काय काय बदलणार? जाणून घ्या.. तुमच्या कामाची गोष्ट
1 November Rules Change : 1 नोव्हेंबरपासून काय काय बदलणार? जाणून घ्या.. तुमच्या कामाची गोष्ट
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
Milk Rate Hike : नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार?
नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, नंदिनी दूध 2022 नंतर 20 रुपयांनी महागलं
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget