एक्स्प्लोर

Sensex Closing Bell: दिवसभरातील उच्चांकावरून सेन्सेक्स 900 अंकांपर्यंत घसरला; गुंतवणूकदारांना 33 हजार कोटींचा फटका

Sensex Closing Bell: शेअर बाजारात आज नफावसुली दिसून आल्याने सेन्सेक्स, निफ्टीत घसरण झाली.

Share Market Closing Bell:  आज गुरुवारी, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना पुन्हा निराशेला सामोरे जावे लागले. नफावसुलीमुळे शेअर बाजार घसरणीसह (Share Market Fallen) बंद झाला. बँकिंग, एफएमसीजी सेक्टरमधील शेअर्समध्ये विक्री दिसून आली. आज व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 440 अंकांच्या घसरणीसह  66,266 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 118 अंकांनी घसरून 19,699 अंकांवर स्थिरावला. आज एका क्षणी दिवसभरातील उच्चांकावरून सेन्सेक्स 920 आणि निफ्टी 264 अंकांनी घसरला होता. पण बाजार नंतर सावरला. 

आज दिवसभरातील व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरले. तर फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी फार्माने 3.04 टक्क्यांची म्हणजे 440 अंकांची उसळण घेतली. निफ्टी फार्माचे सर्व 10 समभाग तेजीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 17 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. 

आजच्या व्यवहारात सन फार्मा 2.10 टक्के, टाटा मोटर्स 0.83 टक्के, भारती एअरटेल 0.69 टक्के, लार्सन 0.62 टक्के, इन्फोसिस 0.30 टक्के, टीसीएस 0.27 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 6.39 टक्के, टेक महिंद्रा 3.82 टक्के, नेस्ले 2.08 टक्के, बजाज फायनान्स 1.98 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे. 

इंडेक्‍स  किती अंकांवर बंद  दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 66,266.82 66,984.17 66,060.74 -0.66%
BSE SmallCap 34,379.25 34,573.90 34,331.61 00:01:00
India VIX 10.51 10.98 9.89 0.53%
NIFTY Midcap 100 37,151.60 37,297.00 37,025.40 0.27%
NIFTY Smallcap 100 11,578.75 11,663.30 11,558.15 0.16%
NIfty smallcap 50 5,217.20 5,271.10 5,204.85 -0.09%
Nifty 100 19,566.70 19,752.45 19,510.30 -0.48%
Nifty 200 10,372.15 10,460.60 10,341.70 -0.38%
Nifty 50 19,659.90 19,867.55 19,603.55 -0.60%

गुंतवणूकदारांना फटका 

शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capital) घटले. आजच्या व्यवहारानंतर बाजार भांडवल 303.59 लाख कोटींवर आले. बुधवारी, बाजार भांडवल 303.92 लाख कोटी इतके होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्ती 33 हजार कोटींची घट झाली. 

1,783 शेअर्समध्ये घसरण

मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) आज घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक आहे. शेअर बाजारात, आज एकूण 3,703 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,776 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,783 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 144 शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारात 201 शेअर्ससा अप्पर सर्किट लागले. त्याच वेळी, 225 शेअर्सने लोअर सर्किटची मर्यादा गाठली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget