एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : बँकिंग, आयटी क्षेत्रात खरेदीचा जोर; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला

Share Market Closing Bell : शेअर बाजारात तेजी दिसून आली. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदीचा जोर दिसला.

Share Market Closing Bell : आज भारतीय शेअर बाजारात (Share Market) चांगली तेजी दिसून आली. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील (Banking And IT Sector )स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजारात तेजी दिसली. आज शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 659 अंकांनी वधारून 59,688  अंकावर बंद झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टीमध्ये 174 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांक 17,798  अंकांवर बंद झाला. 

बँक निफ्टीमध्ये आज चांगलेच तेजीचे वातावरण होते. बँक निफ्टीतील 12 पैकी 11 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर उर्वरित एका शेअरमध्ये घसरण झाली. बँकिंगशिवाय, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये खरेदी दिसून आली. तर, मेटल्स, ग्राहकोपयोगी वस्तू, फार्मा, मीडिया सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही तेजी दिसून आली. 

निफ्टी 50 मधील 37 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर,  13 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 5 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

टेक महिंद्राचे शेअर दर 3.23 टक्क्यांनी वधारले. अॅक्सिस बँकमध्ये 3.22, आयसीआयसीआय बँक 2.57 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2.48 टक्के, भारती एअरटेलच्या शेअरमध्ये 2.28 टक्के, एसबीआयच्या शेअर दरात 2.26 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटच्या दरात 2.22 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 1.91 टक्क्यांनी वधारले. 

टाटा स्टीलच्या शेअर दरात 1.63 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 0.33 टक्के, टायटन कंपनीच्या शेअर दरात 0.32 टक्क्यांनी घसरण दिसून आली.

आज सकाळपासून शेअर बाजारात खरेदीचा जोर राहण्याचे संकेत दिसून आले होते. आज शेअर बाजारातील (Share Market) व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. फार्मा, ऑटो, एफएमसीजी आणि आयटी शेअर दर वधारले होते. बाजार उघडताच निफ्टीने (Nifty) 17750 अंकांची पातळी ओलांडली. तर, सेन्सेक्सने (Sensex) 59400 अंकांचा टप्पा ओलांडला.  सेन्सेक्स 346.08 अंकांनी वधारत 59,374.99 अंकावर खुला झाला होता. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 123.75  अंकांनी वधारत 17,748 अंकांवर खुला झाला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 19 September 2024NCP Vs BJP : राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणारSanjay Pandey Join BJP : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणारBus Boook Modi Event : मोदींच्या कार्यक्रमासाठी तीन दिवस एसटीच्या 760 बस बुकिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Embed widget