एक्स्प्लोर

Reliance Jio : रिलायन्स जिओच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून नियम शिथील, जिओ अन् एएनसईला फायदा होणार

SEBI : सेबीनं आयपीओ लिस्टींग संदर्भातील नियमांमध्ये सुधारणा केली आहे. याचा फायदा जिओ आणि एनएसईला होणार आहे. शेअर बाजारातील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.

SEBI Ease IPO Proposals नवी दिल्ली: भारतातील भांडवली बाजाराची नियामक संस्था असलेल्या सेबीनं आयपीओ संदर्भातील नियम शिथील केले आहेत. याचा थेट फायदा रिलायन्स जिओ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचला होऊ शकतो. नव्या नियमानुसार ज्या कंपन्यांचं आयपीओनंतरचं बाजारमूल्य 50 हजार कोटींपेक्षा अधिक असेल त्यांना त्यांच्या इक्विटीच्या 8 टक्के भागीदारी सार्वजनिक करावी लागेल. आतापर्यंत ही किमान मर्यादा 10 टक्के होती.  
 
याशिवाय ज्या कंपन्यांचं आयपीओनंतरचं बाजारमूल्य 5 लाख कोटींपेक्षा अधिक असेल त्यांच्यासाठी सार्वजनिक शेअर धारकांची किमान ऑफर कमी करुन 2.5 टक्के करण्यात आलं आहे, यापूर्वी ही मर्यादा 5 टक्के होती.  

जिओच्या आयपीओला फायदा

ब्रोकरेज फर्म सिटीच्या नुसार सेबीचं हे पाऊल जिओच्या संभाव्य आयपीओवर सकारात्मक परिणाम करेल.सिटीनं म्हटलं की जिओ प्लॅटफॉर्मचं मूल्य 120 अब्ज डॉलर्स असल्याचं ग्रहित धरल्यास सध्याच्या नियमानुसार 5 टक्के सार्वजनिक ऑफर अशल्यास जिओला 6 अब्ज डॉलरचा आयपीओ आणावा लागला असता. हा भारतीय भांडवली बाजारातील सर्वात मोठा आयपीओ ठरला असता. आता नव्या प्रस्तावानुसार आता 3 अब्ज डॉलरचा आयपीओ जिओकडून आणला जाईल, हा भारतीय गुंतणूकदारांच्या क्षमतेनुसार असेल.  

एनएसईला फायदा होणार

सेबीच्या नव्या नियमाचा फायदा एनएसईला देखील होऊ शकतो. एनएसईकडून पुढील वर्षी 50 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्यासह शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी करत आहे. सेबीचे चेअरमन तुहिन कांत पांडेय यांनी गुरुवारी म्हटलं की बाजार नियामक एक विनियमित मंच तयार करण्याचा विचार करत आहे, जिथं आयपीओ आणणाऱ्या कंपन्या लिस्टेड होण्यापूर्वी काही बाबींवर स्पष्टीकरण दिल्यानंतर कारभार करु शकेल.  ते फिक्कीच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले गुंतवणूकदारांना आयपीओपूर्वी पुरेशी मिहीत नसते. त्यामुळं हा निर्णय गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात फायदेशीर ठरु शकतो.  

प्री-IPO ट्रेडिंग प्लॅटफॉर्म

सेबीच्या नियोजनानुसार एक नवा प्री आयपीओ ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. त्या प्लॅटफॉर्मवरुन गुंतवणूकदारांना आयपीओच्या वाटप आणि लिस्टेड होण्याच्या तीन दिवसांच्य काळात शेअरमध्ये व्यापार करण्याची सुविधा मिळेल. हा प्लॅटफॉर्म अनियमित अशा ग्रे मार्केटची जागा घेऊ शकतो. आयपीओ पहिल्यापासून ट्रेडिंगचा आधार बनू शकतो.सेबीच्या नव्या पावलांमुळं फक्त जिओ आणि एनएसईला फायदा होणार नाही तर भारतीय शेअर बाजारात पारदर्शकता आणि स्थिरता वाढू शकते. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget