50 झाडे लावा, करोडपती व्हा, कमी काळात शेतकऱ्यांना मालामाल होण्याचा सोपा मार्ग
अलीकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहेत. या माध्यमातून शेतकरी चांगला नफा देखील कमवत आहेत.
Sandalwood cultivation : अलीकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहेत. या माध्यमातून शेतकरी चांगला नफा देखील कमवत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी चंदनाची लागवड (Sandalwood cultivation) करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जरम्यान, आता उत्तर भारतातील शेतकरीही चंदनाची लागवड करु शकणार आहेत. उत्तम व दर्जेदार चंदनाची रोपे तयार करण्यासाठी केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्थेत विशेष तंत्रज्ञानावर संशोधन केले जात आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढू शकते. चंदनाची फक्त 50 झाडेच तुम्हाला 15 वर्षात करोडपती बनवू शकतात.
चंदनाचे झाड जितके जुने होईल तितके त्याचे मूल्य वाढते. 15 वर्षांनंतर झाडाची किंमत 2 लाख रुपयांपर्यंत जाते. ही अतिशय फायदेशीर शेती आहे. जर एखाद्या व्यक्तीने फक्त 50 झाडे लावली तर 15 वर्षांनी त्याचे मूल्य 1 कोटी रुपये होईल. वार्षिक सरासरी उत्पन्न 8.25 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.
विविध वस्तू तयार करण्यासाठी चंदनाचा वापर
चंदनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामध्ये पूजेत टिळक लावण्यासोबतच त्याचे चंदनाचे पांढरे लाकड आणि लाल चंदनाच्या मूर्ती बनवणे, सजावटीचे साहित्य, हवन आणि अगरबत्ती बनवणे तसेच सुगंधी द्रव्ये आणि अरोमाथेरपी इत्यादीसाठी वापरले जाते. आयुर्वेदातही चंदनापासून अनेक औषधे तयार केली जातात. चंदनाची लागवड दक्षिण भारतात सर्वाधिक होते. कारण केंद्र सरकारने 2001 मध्ये चंदन लागवडीवरील बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांचा त्याकडे कल वाढला आहे . मात्र तंत्रज्ञानाच्या तीव्र अभावामुळे त्याच्या लागवडीला अपेक्षित गती मिळू शकली नाही.
चंदन ही परोपजीवी वनस्पती
चंदन ही परोपजीवी वनस्पती आहे. ते स्वतःचे पोषण स्वतः घेत नाही तर दुसऱ्या झाडाच्या मुळापासून पोषण घेते. जिथे चंदनाचे रोप असेल तिथे शेजारी दुसरी रोपे लावावी लागतात. कारण चंदन आपली मुळे शेजारच्या झाडाच्या मुळापर्यंत पसरवते आणि स्वतःला त्याच्या मुळाशी जोडते आणि त्यातून आपले पोषण घेऊ लागते. उत्तर प्रदेशातील कर्नालमध्ये शेतकऱ्यांना विशेष तंत्र वापरुन चंदन लागवडीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यामध्ये झाडांमधील अंतर किती असावे, खत आणि पाणी किती द्यावे हे सांगितले जाणार. चंदनासह इतर कोणती पिके घेतली जाऊ शकतात? विशेषत: कमी पाणी लागणाऱ्या कडधान्य पिकांवर काम केले जात आहे. चंदनाच्या शेतीबरोबरच ते फळझाडे देखील लावू शकतात. कारण, चंदनाचे झाड वाढण्यास 15 वर्षे लागतील ज्यामुळं त्यांना दुसऱ्या बाजूने फायदा मिळू शकेल.