Rupee vs Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण; प्रथमच प्रति डॉलर 80 रुपयांच्या खाली घसरला
Rupee vs Dollar : आज प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपयाने 80 रुपये प्रति डॉलरची घसरण पाहायला मिळत आहे.
Rupee vs Dollar : आज प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपयाने 80 रुपये प्रति डॉलरची घसरण पाहायला मिळत आहे. आज रुपया प्रति डॉलर 80 रुपयांच्या खाली गेल्याने व्यापाऱ्यांना प्रचंड नैराश्य आले आहे. यासह, रुपया या वर्षी 7 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून याची चिन्हे दिसत होती असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
कशी सुरुवात झाली रुपयाची?
सुरुवातीच्या व्यापारात रुपया 80.01 रुपये प्रति डॉलरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता, तर काल तो 79.97 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला.
रुपयातील चढउतार
आज सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 80.05 रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर गेला होता, मात्र आता त्यात 11 पैशांची वाढ होताना दिसत आहे. सकाळी 9.56 वाजता डॉलरच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी वाढून 79.94 रुपयांवर दिसत आहे.























