एक्स्प्लोर

उद्यापासून देशात होणार 'हे' महत्त्वाचे बदल; तुमच्या महिन्याच्या बजेटवर होणार थेट परिणाम

Rule Change From Tomorrow: उद्यापासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या बजेटवर होणार आहे. जाणून घ्या नेमके कोणते बदल होणार आहेत, त्याबाबत सविस्तर...

Rule Change From 1st September: उद्या 1 सप्टेंबर 2023... दरमहिन्याप्रमाणे उद्यापासूनही अनेक महत्त्वाचे बदल (Rule Change) आपल्या दैनंदिन व्यवहारात होणार आहेत. या बदलांमुळे तुमच्या-आमच्या दैनंदिन व्यवहारांसोबतच महिन्याच्या बजेटवरही परिणाम होणार आहे. स्वयंपाकघरापासून ते अगदी शेअर मार्केटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. यासोबतच नोकरदार वर्गासाठी एक मोठा बदल होणार आहे. नोकरदार वर्गाच्या टेक होम सॅलरीमध्ये मोठी वाढ होणार आहे. एवढंच नाहीतर देशातील अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर महिना ही अंतिम मुदत आहे. जाणून घेऊयात आजपासून देशात काय बदल होणार आहे ते सविस्तर...

एलपीजी सिलेंडरच्या किमती (LPG Cylinder Prices)

देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींत बदल करतात. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर्सच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किमतींत मोठा दिलासा देत केंद्र सरकारनं दोन दिवस अगोदर 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली आहे. यानंतर बुधवारपासून देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. 

CNG-PNG आणि एअर फ्यूएलच्या दरांत बदल (CNG-PNG And Air Fuel Rates)

एलपीजीच्या किमतींसोबतच (LPG Price), तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधनाच्या (ATF) किमती बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही CNG-PNG च्या दरांत (CNG-PNG Price)  बदल केला जाऊ शकतो. याशिवाय उद्यापासून देशात सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल केला जाऊ शकतो. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना स्वयंपाकघरापासून ते त्यांच्या प्रवासापर्यंतही जाणवू शकतो.

आयपीओसाठी T+3 नियम (T+3 Rule for IPOs)

मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) नं Initial Public Offering म्हणजेच, आयपीओ (IPO) बंद झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या स्टॉक्सची लिस्टिंग होण्याची वेळ मर्यादा अर्ध्यापर्यंत म्हणजेच, तीन दिवसांपर्यंत केली आहे. यापूर्वी ही वेळ मर्यादा सहा दिवसांची होती. लिस्टिंगच्या या नव्या नियमामुळे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांसोबतच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे. SEBI नं यासंदर्भात यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे. आपल्या अधिसूचनेत सेबीनं म्हटलं आहे की, 1 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर येणार्‍या सर्व IPO साठी लिस्टिंगच्या वेळेचे नवीन नियम स्वेच्छेनं लागू केले जातील. तसेच, 1 डिसेंबर 2023 पासून, कंपन्यांना नियमांचं पालन अनिवार्यपणे करावं लागेल. SEBI नं 28 जून रोजी झालेल्या बैठकीत T+3 नियमाला मान्यता दिली होती.

'या' क्रेडिट कार्डचे नियम बदलणार  (Axis Bank Credit Card Rules)

1 सप्टेंबर 2023 अॅक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड (Axis Bank Magnus Credit Card) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची असणार आहे. सप्टेंबरच्या एक तारखेपासून या क्रेडीट कार्डाच्या अटी आणि शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. बँकेच्या वेबसाईटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर विशेष सवलतींचा लाभ घेऊ शकणार नाहीत. एवढंच नाही तर या क्रेडिट कार्डशी संबंधित आणखी एक धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे 1 सप्टेंबरपासून नवीन कार्डधारकांना वार्षिक शुल्कही भरावं लागणार आहे, याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.

सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँक हॉलिडे 

सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर, आधीच पूर्ण करुन घ्या. कारण संपूर्ण महिन्याभरात तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. RBI ने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांनुसार या बँक सुट्ट्या बदलू शकतात. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. एकीकडे कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे सण पुढील महिन्यात 2023 च्या सप्टेंबरमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे 3, 9, 10, 17, 23 आणि 24 सप्टेंबरला रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यामुळे बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगाSpecial Report | Waghya Dog Statue Issue | 'वाघ्या'चं कारण, जातीवरुन राजकारणSpecial Report | Disha Salian | आरोपांना ड्रग्जची 'दिशा', आदित्य ठाकरेंविरोधात स्फोटक आरोपRajkya Shole | Prashant Koratkar | कोरटकरचा आका कोण?महिनाभर पोलिसांना गुंगारा,कोरटकरला आसरा  कुणाचा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Sanjay Raut Kunal Kamra :  कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Embed widget