पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
मुंबई : नैसर्गिक तत्त्वांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलाचा सुगंध ही पितांबरी देवभक्ती अगरबत्तीची खासियत आहे.

मुंबई : नैसर्गिक सुगंध आणि भक्तीचा अनोखा संगम घेऊन 'पितांबरी देवभक्ती अगरबत्ती' आता देशभरातील ग्राहकांच्या भेटीला आली आहे. देशातील विश्वासार्ह एफएमसीजी ब्रँड पितांबरीने राष्ट्रीय अगरबत्ती बाजारपेठेत प्रवेश करत या उत्पादनाच्या प्रचारासाठी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
नैसर्गिक तत्त्वांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलाचा सुगंध ही पितांबरी देवभक्ती अगरबत्तीची खासियत आहे. दीर्घकाळ टिकणारा नैसर्गिक सुगंध आणि कमी धूर यामुळे ही अगरबत्ती पूजेला अधिक शांत, सुखद आणि प्रसन्न बनवते. चंदन, मोगरा, गुलाब, चंपा अशा विविध नैसर्गिक सुगंधांमध्ये पितांबरी देवभक्ती अगरबत्ती उपलब्ध करण्यात आली आहे.
पितांबरी देवभक्ती अगरबत्ती भारतातील पहिली मास-प्रोडयुस्ड नैसर्गिक सुगंधाची अगरबत्ती असून पितांबरीने ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन परंपरा, गुणवत्ता आणि नावीन्य जपण्याचा प्रयत्न या उत्पादनातून केला आहे.
या जाहिरातीची संकल्पना "देव आपल्या प्रत्येक क्षणी सोबत असतो, आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आशीर्वाद देतो. " या भावनेवर आधारित आहे. भारतीय घरांमध्ये प्रत्येक दिवसाची सुरुवात देवपूजा आणि ईश्वराच्या आशीर्वादाने होते. मग तो रिक्षाचालक असो, चहावाला, दुकानदार किंवा संपूर्ण कुटुंब, प्रत्येक जण नवीन आशा घेऊन देवाच्या प्रार्थनेने दिवसाची सुरुवात करतो. पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा नैसर्गिक सुगंध प्रत्येक प्रार्थनेला देवापर्यंत पोहचवण्याचे माध्यम बनतो. ईश्वराशी अधिक आत्मीयतेने जोडल्याची अनुभूती देतो आणि प्रत्येक प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवतो. या जाहिरातीचा मुख्य संदेश "हा देश जागतो नव्या आशा आणि स्वप्नांसह" हा असून "जिथे श्रद्धा आणि भक्ती, तिथे दरवळे पितांबरी देवभक्ती" या समर्पक टॅगलाईनने जाहिरातीचा समारोप होतो.
रितेश देशमुख यांची सहज, प्रभावी, आध्यात्मिक शैली आणि भावपूर्ण निवेदन या जाहिरातीत श्रद्धा, आणि भक्तीभाव अधिक प्रभावीपणे अधोरेखित करते.
या जाहिरातीविषयी बोलताना रितेश देशमुख म्हणतात; "पितांबरी हा देशातील विश्वासू, मराठमोळा आणि परंपरा जपणारा ब्रँड आहे. 'पितांबरी देवभक्ती अगरबत्ती' जाहिरातीच्या माध्यमातून मला भारतीय संस्कृतीतील श्रद्धा आणि भक्तीचे महत्व अधोरेखित करण्याची संधी मिळाली याचा अत्यंत आनंद आणि अभिमान आहे. पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचे नैसर्गिक सुगंध खरोखरच अप्रतिम असून ही अगरबत्ती प्रत्येक घरातील पूजेचा महत्वपूर्ण भाग बनेल असा विश्वास वाटतो."
या जाहिरात मोहिमेची संकल्पना आणि दिग्दर्शन महेश लिमये यांच्या ली प्रॉडक्शन्सने आणि पितांबरी क्रिएटिव्ह टीमच्या सहकार्याने केले आहे. या उत्पादनाच्या देशव्यापी प्रचारासाठी टीव्ही, वृत्तपत्रे, आणि सोशल मीडिया अशा विविध माध्यमांद्वारे 360 डिग्री जाहिरात मोहीम राबविण्यात येणार आहे.
याविषयी बोलताना पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर, डॉ. रविंद्र प्रभुदेसाई, म्हणाले, "ईश्वरावर माझी दृढ श्रद्धा आणि अढळ विश्वास आहे. भारतीय संस्कृतीत आणि प्रत्येक घरात प्रार्थनेला नेहमीच विशेष स्थान आहे. म्हणूनच पितांबरी देवभक्ती अगरबत्तीच्या माध्यमातून नैसर्गिक तत्त्वे आणि अस्सल फुलांच्या सुगंधासह पूजा-अर्चनेचा अनुभव अधिक पवित्र आणि आनंददायी करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे ही अगरबत्ती देशभरातील ग्राहकांच्या दैनंदिन पूजेचा अविभाज्य भाग बनेल, असा आम्हाला विश्वास आहे."
कंपनीचे व्हाइस चेअरमन, श्री. परिक्षित प्रभुदेसाई, म्हणाले, "आमच्या मजबूत वितरण प्रणालीमुळे पितांबरी देवभक्ती अगरबत्ती देशभरातील ग्राहकांना सहज उपलब्ध होऊ शकेल. विशेष म्हणजे देवभक्ती अगरबत्ती ही अस्सल फुलांचा नैसर्गिक सुगंध असलेली भारतातील पहिल्या मास-प्रोड्युस्ड अगरबत्त्यांपैकी एक आहे. ग्राहक आज शुद्धता, गुणवत्ता आणि योग्य मूल्याला अधिक महत्व देत आहेत. त्यामुळे ही अगरबत्ती ग्राहकांच्या पसंतीस उतरून देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा आम्हाला विश्वास आहे."
प्रिया प्रभुदेसाई, डायरेक्टर, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. म्हणाल्या, "देशभरात आमची जाहिरात मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही विभागनिहाय विस्तारावर भर देणार आहोत आणि टप्याटप्याने विविध राज्यांमध्ये पोहचत आहोत. प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमांच्या सहाय्याने आमचे उद्धिष्ट भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोहचणे आणि पितांबरी देवभक्ती अगरबत्तीला प्रत्येक घरातील दैनंदिन पूजेचा अविभाज्य भाग बनवणे आहे."
पितांबरी देवभक्ती अगरबत्तीच्या माध्यमातून कंपनीने राष्ट्रीय अगरबत्ती बाजारपेठेत दमदार प्रवेश केला आहे. या लॉन्चमुळे पितांबरीच्या विश्वासार्ह उत्पादनांच्या श्रेणीत आणखी एका दर्जेदार उत्पादनाची भर पडली आहे. नैसर्गिक सुगंध, उत्कृष्ट गुणवत्ता आणि भारतीय श्रद्धेची सांगड घालणारी पितांबरी देवभक्ती अगरबत्ती देशभरातील ग्राहकांच्या दैनंदिन पूजेचा अविभाज्य भाग बनेल, असा कंपनीला विश्वास आहे.
(टीप : हा एक प्रायोजित लेख आहे. ABP Network Pvt. Ltd. आणि/किंवा ABP Live या लेखातील मजकूर आणि/किंवा त्यामध्ये व्यक्त केलेल्या मतांचे कोणत्याही प्रकारे समर्थन किंवा अनुमोदन करत नाहीत.)
महत्त्वाच्या बातम्या






















