एक्स्प्लोर

RBI : रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्लास्टिकच्या नोटांच्या छपाईच्या जुन्या योजनेवर पुन्हा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आता पुन्हा एकदा पॉलिमर नोटांचा विचार सुरू केला आहे. RBI च्या पाटणा व मुंबई येथे झालेल्या अलीकडील बोर्ड बैठकांमध्ये या विषयावर चर्चा झाली असून लवकरच एक पायलट प्रकल्प जाहीर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्डकडून देण्यात आलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वातील  यूपीए सरकारच्या काळात 2012 मध्ये प्लास्टिक नोटांच्या छपाईचा विचार करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळं त्यावेळी तो प्रस्ताव मागे पडला होता.   

रिझर्व्ह बँकेचा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नोटा छपाईवरील खर्च 6372   कोटींवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नोटा छपाईसाठीचा खर्च 5101.4 कोटी रुपये होता. त्यामध्ये 2024-25 मध्ये वाढ झाली आहे.  असून मोठ्या प्रमाणावर खराब नोटा चलनातून बाद कराव्या लागत आहेत, हे या नव्या निर्णयाचे प्रमुख कारण आहे.

नोटांची मागणी वाढल्यानं पॉलिमर बँक नोटांचा विचार

गेल्या काही वर्षांमध्ये करन्सी नोटांची मागणी वाढल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं  पॉलिमर बँक नोट छपाईच्या संकल्पनेवर नव्यानं विचार सुरु केल्याची माहिती आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन बोर्ड मीटिंग मुंबई आणि पाटणा येथे झाल्या होत्या त्यामध्ये पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. 

कागदाच्या नोटांच्या छपाईचा खर्च कमी करणे आणि नोटांची शेल्फ लाईफ वाढवणे यासाठी पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटांची छपाई करण्याबाबत विचार केला जात आहे.  प्लास्टिक नोटा छपाईसाठी आरबीआयकडून लवकरच पायलट प्रोजेक्ट जाहीर केला जाऊ शकतो. याशिवाय एटीएममधून प्लास्टिकच्या नोटांचा पुरवठा करण्यासंदर्भातील यंत्रणा सुरु केली जाऊ शकते. 

प्लास्टिकच्या नोटांची शेल्फ लाईफ म्हणजेच साठवण कालमर्यादा सध्याच्या कागदी नोटांच्या तुलनेत वाढणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 23.8 अब्ज नोटांची विल्हेवाट लावण्यात आली होती. ज्यामध्ये 100 आणि 500 रुपयांच्या नोटांची संख्या अधिक होती. 

चलनात असलेल्या नोटांच्या प्रमाणात 11.5 टक्के वाढ होत आहे.  15 मेच्या आकडेवारीनुसार 42.86 ट्रिलियन रुपयांच्या नोटा चलनात आहेत.  आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये चलनात 1.15 ट्रिलियन रुपयांच्या नोटा वाढल्या आहेत. एकीकडे डिजीटल व्यवहार यूपीआयद्वारे वाढलेले असताना नोटांची संख्या देखील वाढली आहे.

2012 मधील प्लास्टिक (पॉलिमर) नोटांची योजना:

2012 साली तत्कालीन केंद्र सरकारने 5 शहरांमध्ये 100 कोटी 1 अब्ज रुपयांच्या ₹10 च्या पॉलिमर नोटांचा फील्ड ट्रायल करण्यास मंजुरी दिली होती. या पाच शहरांची निवड वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती व हवामानाचा विचार करून केली गेली होती. 

कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला, या पाच शहरांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार होता.योजनेचा प्राथमिक उद्देश नोटांचा टिकाऊपणा वाढवणे हा होता, बनावट नोटांना  रोखणे हा मुख्य उद्देश नव्हता, असे तत्कालीन UPA सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, तांत्रिक व अंमलबजावणीतील अडचणींमुळे ही योजना नंतर बारगळली. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 24 तासांत सोन्यात 4500, तर चांदीमध्ये 11000 रुपयांची उडी, भाववाढीचं कारणंही समोर
सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 24 तासांत सोन्यात 4500, तर चांदीमध्ये 11000 रुपयांची उडी, भाववाढीचं कारणंही समोर
Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Embed widget