एक्स्प्लोर

Rakesh Jhunjhunwala : 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांच्या शेवटच्या निर्णयावर अंमलबजावणी; 'या' कंपनीत गुंतवणूक

Rakesh Jhunjhunwala Last Deal: 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांनी घेतलेल्या शेवटच्या निर्णयावर त्यांच्या कंपनीने शिक्कामोर्तब केले.

Rakesh Jhunjhunwala Last Deal: भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या निधनानंतर RARE Enterprises या त्यांच्या कंपनीने त्यांनी घेतलेल्या शेवटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Last Investment) यांच्या कंपनीने आज मंगळवारी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा  Singer India कंपनीत 10 टक्के खरेदी केले आहेत.

राकेश झुनझुनवाला यांनी मागील आठवड्यात Singer India कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच रविवारी 14 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचे निधन झाले. सोमवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद होता. मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर Rare Enterprises ने सकाळीच Singer India मध्ये बल्क डीलमध्ये 10 टक्के शेअर खरेदी केले. त्यामुळे  Singer India मध्ये गुंतवणूक करत Rare Enterprises ने राकेश झुनझुनवाला यांची शेवटची इच्छा पूर्ण केली. Singer India कंपनीही शिलाई मशीनचे उत्पादन करते. भारतासह जगातील इतर देशांमध्ये हा ब्रॅण्ड प्रसिद्ध आहे. 

Rare Enterprises  ने  Singer India मध्ये 10 टक्के भागिदारी खरेदी केली आहे. Rare Enterprises ने बल्क डीलमध्ये व्यवहार केल्यानंतर शेअर दरात मोठी उसळण दिसून आली. या व्यवहारानंतर आज Singer India चा प्रति शेअर दर 69.15 रुपये इतका झाला. आज शेअर दरात अप्पर सर्किट लागला. शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी शेअर दर 57.65 रुपयांवर बंद झाला. 

राकेश झुनझुनवाला यांनी 1985 च्या सुमारास अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना पहिला नफा 1986 च्या सुमारास मिळाला. पहिल्याच गुंतवणुकीत झुनझुनवाला यांनी जवळपास तीन पट नफा मिळवला होता, असे म्हटले जाते. झुनझुनवाला यांनी 'टाटा टी' चे पाच हजार शेअर्स 43 रुपयांच्या दराने खरेदी केले होते. हेच शेअर त्यांनी 143 रुपयांना विकले. त्यानंतरच्या पुढील तीन वर्षात त्यांनी जवळपास 20 लाख रुपये कमावले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख त्यांना मिळाली होती. 

दरम्यान, आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 133अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.67 टक्क्यांची वाढ होऊन 59,863 तो अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.76 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,831 अंकावर पोहोचला. निफ्टी बँकच्या इंडेक्समध्येही आज 207 अंकांची वाढ होऊन तो 39,249 अंकांवर पोहोचला.  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Embed widget