एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PPF Investment : दरमहा 12,500 ची गुंतवणूक करुन करोडपती होण्याकडे वाटचाल करा, जाणून घ्या हमी परतावा योजना
PPF Investment : जर तुमचे स्वप्न करोडपती होण्याचे असेल तर ते नक्की पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या पैशाचा काही भाग दर महिन्याला गुंतवावा लागेल
PPF Investment : जर तुमचे स्वप्न करोडपती होण्याचे असेल तर ते नक्की पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या पैशाचा काही भाग दर महिन्याला गुंतवावा लागेल, त्यानंतर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या बातमीत आम्ही तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफमधील गुंतवणुकीची माहिती देणार आहोत. यामध्ये तुम्ही 25 वर्षांसाठी दरमहा 12,500 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळेल. जाणून घ्या.
PPF मध्ये गुंतवणूक म्हणजे काय
PPF मध्ये गुंतवणूक म्हणजे काय
पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. हा खूप जुना आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय आहे. यामध्ये गुंतवणुक केल्याने तुम्हाला चांगला आणि सुरक्षित परतावा मिळतो, त्यासोबतच तुम्हाला टॅक्स वाचवण्यातही मदत होते. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या तिन्हींवर कर भरावा लागणार नाही. तुम्हाला प्राप्तिकराच्या कलम 80C (इन्कम टॅक्स) प्रमाणे 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीची सुविधा मिळते.
इतके चक्रवाढ व्याज मिळेल
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ अतिशय सुरक्षित मानला जातो. सध्या या योजनेत ७.१ टक्के दराने चक्रवाढ व्याज मिळत आहे. पीपीएफ योजनेत गुंतवणूकदारांना सरकारी हमी दिली जाते. पीपीएफ पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे नियंत्रित केले जाते. त्यामुळे या योजनेवरील व्याज केंद्र सरकारच ठरवते. यामध्ये तुम्हाला हमी परताव्याची सुविधा दिली जाते, म्हणजे तुमचे पैसे त्यात गुंतवून पूर्णपणे सुरक्षित आहेत.
करोडपती होण्याचे हे सूत्र
करोडपती होण्याचे हे सूत्र
जर तुम्हाला PPF योजनेत गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला या फंडात दरमहा किमान 12,500 रुपये म्हणजेच वार्षिक 1,50,000 रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे, जेव्हा तुम्ही 25 वर्षांसाठी सुमारे 300 हप्त्यांमध्ये पैसे गुंतवता तेव्हा तुम्ही एकूण रु.37,50,000 जमा करता. 25 वर्षांनंतर तुम्हाला मुदतपूर्तीच्या वेळी 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली जाईल, ज्यात जमा केलेल्या रकमेवरील व्याजाचा समावेश आहे.
कोणतीही गुंतवणूक करा
कोणतीही गुंतवणूक करा
प्रत्येकजण पीपीएफ योजनेत गुंतवणूक करू शकतो. तुम्ही यामध्ये फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन पीपीएफ खाते उघडावे लागेल. तुम्ही पीपीएफ खात्यात दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. त्याच वेळी, खाते सक्रिय ठेवण्यासाठी, दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागतील.
PPF मधील गुंतवणूक निधी समजून घेऊया
PPF मधील गुंतवणूक निधी समजून घेऊया
वार्षिक गुंतवणूक - 1,50,000 रुपये प्रति वर्ष
योजना वेळ - 25 वर्षासाठी गुंतवणूक (महिन्यांच्याप्रमाणे अंदाजे 300 हप्ते)
एकूण व्याजदर - 7.1 टक्के पासून उपलब्ध होईल
25 वर्षात काही गुंतवणूक - रु 37,50,000
एकूण व्याज - रु. 65,58,015
परिपक्वता रक्कम - रु 1,03,08,015
योजना वेळ - 25 वर्षासाठी गुंतवणूक (महिन्यांच्याप्रमाणे अंदाजे 300 हप्ते)
एकूण व्याजदर - 7.1 टक्के पासून उपलब्ध होईल
25 वर्षात काही गुंतवणूक - रु 37,50,000
एकूण व्याज - रु. 65,58,015
परिपक्वता रक्कम - रु 1,03,08,015
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement