पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, घरबसल्या महिना 9,250 रुपये मिळवा
गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफीसची योजना (Post Office Scheme) देखील फायदेशीर ठरते. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही वर्षाला 111000 रुपये मिळवू शकता. तर दर महिन्याला 9,250 मिळवू शकता.
Post Office Scheme : गुंतवणुकीच्या (Investment) दृष्टीनं विविध योजना सुरु झाल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून ठेवीदारांना चांगला परतावा मिळत आहे. कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळत आहे. जर महिन्याला तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक केली तर तुम्हाला काही वर्षानंतर व्याजासह (Interst) मोठी रक्कम मिळते. दरम्यान, गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफीसची योजना (Post Office Scheme) देखील फायदेशीर ठरते. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही वर्षाला 111000 रुपये मिळवू शकता. तर दर महिन्याला 9,250 मिळवू शकता.
पाच वर्षासाठी जर गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.4 टक्क्यांचा व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या सरकारी हमी ठेव योजनेत एकल किंवा संयुक्त खाते सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करु शकता. या रकमेवर तुम्हाला महिन्याला व्याज मिळते. पोस्टाच्या हमी ठेव योजनेत तुम्ही पाच वर्षासाठी जर गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.4 टक्क्यांचा व्याजदर मिळतो. या योजनेत तुम्ही जर संयुक्त खात्याद्वारे 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला महिना 9,250 रुपये मिळतात. सेवा निवृत्त झालेल्या व्यक्तिंसाठी ही योजना उत्तम आहे.
प्रत्येक महिन्याला तुम्हाला 9,250 रुपये मिळणार
तुम्ही जर एकदमच 15 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला 7.4 टक्के व्याज मिळते. एका वर्षात तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 1,11,000 रुपयांचे अधिक उत्पन्न मिळते. पाच वर्षात तुम्हाला एकूण 5,55,000 मिळतील. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला 9,250 रुपये मिळतील. जर तुम्ही 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर एका वर्षात तुम्हाला 66,600 रुपये व्याज मिळू शकते. म्हणजे पाच वर्षात तुम्हाला 3,33,000 रुपयांचे व्याज मिळते. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 5550 रुपये मिळतात. दरम्यान पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत कोणत्याही देशाचा नागरिक खाते उघडू शकतो. मुलाच्या नावाने देखील यामध्ये खाते उघडता येते.
महत्वाच्या बातम्या: